Full Width(True/False)

भारतानंतर अमेरिकेचाही चीनला झटका, घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

नवी दिल्लीः डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पद सोडण्याआधी चीनला आणखी एक झटका दिला आहे. चायनीज कंपनीशी संबंध असलेले ८ अॅपवर बंदी घातली आहे. ट्रम्प यांनी जाता-जाता या अॅपवरील बंदीच्या आदेशावर स्वाक्षरी केली आहे. ज्या अॅपवर बंदी घातली आहे त्यात विचॅट अॅप () आणि जॅक मा यांच्या ग्रुपचा () यांचा समावेश आहे. वाचाः ट्रम्प यांनी आदेशात म्हटले की, चीनमध्ये बनवलेल्या आणि तेथून ऑपरेट करणाऱ्या या अॅपमुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका आहे. त्यामुळे या अॅप्सला तात्काळ कारवाई करण्याची गरज आहे. ट्रम्प यांनी या आदेशावर स्वाक्षरी केली त्यावेळी त्यंनी भारताच्या निर्णयाचे उदाहरण दिले आहे. ज्यात २०० हून अधिक चीनची संबंधित सॉफ्टवेयरवर बंदी घातली आहे. वाचाः ४५ दिवसांत बंद होणार अॅप ट्रम्प यांच्या आदेशानंतर हे सर्व चीनी अॅप बनवलेले तसेच तेथून ऑपरेट करीत आहे. (Alipay), कॅमस्कॅनर (CamScanner), क्यूक्यूवॉलेट (QQ Wallet), शेयरइट (), टेनसेंट क्यूक्यू (Tencent QQ), वीमॅट (VMate), वीचॅट पे (WeChat Pay) आणि डब्ल्यूपीएस ऑफिस (WPS Office) विरोधात बंदी घातली आहे. हे सर्व अॅप ४५ दिवसांत बंद होतील. वाचाः ऑगस्ट मध्ये सुद्धा चीन कंपनी बाइटडान्सची मालकी असलेली टिकटॉक आणि विचॅट अॅपवर बंदी घातली होती. परंतु, त्यानंतर अमेरिकेच्या कोर्टाने शॉर्ट व्हिडिओ शेयरिंग अॅप टिकटॉकवर घातलेली बंदी उठवण्यात आली होती. सॉफ्टेवेयरच्या मदतीने डेटा चोरी कार्यकारी आदेशानुसार, भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि सूचना मंत्रालयाने सांगितले की, चीनी अॅप अनधिकृत पद्धतीने सर्वरवरून डेटा चोरी करीत होते. संयुक्त राज्य अमेरिकेने सांगितले की, चीन कनेक्टेड सॉफ्टवेयर अॅप्लिकेशन मोठ्या संख्येत अमेरिकन युजर्संचा डेटा मिळवत होते. त्यात संवेदनशील माहितीचा समावेश होता. वाचाः वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2XiYu0c