Full Width(True/False)

आधार कार्डवरील नाव-पत्ता बदलणे सोपे, मोबाइलवरून स्वतः 'असा' बदल करा

नवी दिल्लीः अनेकदा आधार कार्डवरील नावात काही तरी चूक किंवा आपण दिलेल्या पत्त्यात चूक झालेली असते. त्यामुळे आता खासगी काम असो की सरकारी. आवश्यक बनले आहे. जर तुम्हाला तुमच्या आधार कार्डवरील झालेली चूक किंवा पत्त्यात झालेली चूक दुरूस्त करायची असेल तर फार चिंता करण्याची गरज नाही. तुम्ही स्वतः तुमच्या मोबाइलवरून यात दुरूस्ती करू शकता. UIDAI ने काही वेळेआधी आधार कार्डमध्ये सेल्फ अपडेट सर्विसला बंद केले होते. परंतु, आता पुन्हा एकदा ही सर्विस सुरू करण्यात आली आहे. वाचाः हे बदल करू शकता आधार कार्डमध्ये केवळ नाव नव्हे तर जन्मतारीख, घराचा पत्ता, मोबाइल नंबर सुद्धा बदलता येवू शकतो. आधार कार्डमधील आपले नाव बदलण्यासाठी तुम्हाला कुठे जाण्याची गरज नाही. फक्त तुमच्या आधार कार्डमध्ये रजिस्टर नंबर असायला हवा. तसेच मोबाइलमध्ये इंटरनेट. जाणून घ्या आधार कार्डवरील काही बदल करायचा असेल तर सोपी पद्धत कोणती आहे. अवघ्या काही मिनटात आधार कार्डवरील नाव, पत्ता, बदलू शकता. वाचाः आधार कार्डमध्ये ऑनलाइन असा बदल करा सर्वात आधी च्या ऑफिशल वेबसाइट uidai.gov.in जा. होमपेजवर तुम्हाला आधी MY Aadhaar ऑप्शन दिसेल. यावर क्लिक करा. आता तुम्हाला Update Your Aadhaar सेक्शन मध्ये जावे लागेल. या ठिकाणी तुम्हाला एक कॉलम दिसेल. Update your Demographics Data Onlineचे. यावर क्लिक करा. यावर क्लिक करताच तुम्ही UIDAI च्या सेल्फ सर्विस अपडेट पोर्टलच्या अधिकृत वेबसाइटवर ssup.uidai.gov.in पोहोचाल. या ठिकाणी तुम्हाला तुमचा १२ डिजिट आधार नंबरने लॉग इन करावे लागेल. यानंतर स्क्रीनवर दिसत असलेल्या कॅप्चेला भरा. आणि सेंड ओटीपी वर क्लिक करा. यानंतर आपल्या रजिस्टर मोबाइल नंबर वर ओटीपी येईल. ओटीपी टाकल्यानंतर पुढील स्टेपमध्ये तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल. ज्यात तुम्ही आपली वैयक्तिक माहिती, जसे, पत्ता, जन्मतारीख, नाव, जेंडर, सह अन्य माहिती भरावी लागेल. आता तुम्हाला त्या सेक्शनला निवडावे लागेल. ज्यात तुम्हाला बदल करायचा आहे. तुमच्यासमोर नाव, जन्मतारीख, पत्ता बदल करण्याचे ऑप्शन असतील. ज्यात बदल करायचा आहे. त्यातील अपडेट नाववर क्लिक करा. या ठिकाणी नावाला अपडेट करण्यासाठी तुमच्याकडे एक आयडी प्रूफ असणे गरजेचे आहे. आयडी पुरावा म्हणून पॅन कार्ड, ड्रायविंग लायसन्स, मतदान कार्ड, रेशन कार्ड अपलोड करू शकता. सर्व डिटेल्स दिल्यानंतर तुम्हाला तुमच्या नंबरवर एक व्हेरिफिकेशन ओटीपी येईल. त्याला व्हेरिफाय करावे लागेल. त्यांतर सेव्ह चेंज करावे लागेल. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/35ifOqw