मुंबई टाइम्स टीम बॉलिवूडविश्वात महिलाकेंद्रीत आशय लोकप्रिय असतो. सशक्त स्त्री पात्र असलेले चित्रपट लोकप्रिय झाल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे. चित्रपटांच्या पावलावर पाऊल ठेवत ओटीटीवर () महिलांच्या आयुष्यावर प्रकाश टाकणाऱ्या अनेक सीरिज प्रदर्शित झाल्या. त्या प्रेक्षकांच्या पसंतीसही उतरल्या. हाच फॉर्म्युला फॉलो करत येत्या काळात अनेक महिलाकेंद्रीत सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. आजही महिला स्वत:ला सिद्ध करण्यासाठी झगडत आहेत. स्वप्न पूर्ण करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत. हे फक्त ग्रामीण भागातलं चित्र नसून शहरातल्या महिलांची अवस्था देखील सारखीच आहे. याच विषयावर भाष्य करणार '' ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीरिजमध्ये वेगवेगळ्या वयोगटातल्या पाच महिलांची कथा सांगण्यात येणार आहे. या पाच महिला स्वत:ची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी कशी मेहनत घेतात आणि त्यांचे एकमेकांशी असलेले बंध सीरिजमध्ये पाहता येणार आहेत. धकधक गर्ल माधुरी दीक्षित-नेने ओटीटीवर पदार्पण करणार आहे. ती मुख्य भूमिकेत असलेल्या सीरिजचं नाव 'अॅक्ट्रेस' असून ते तात्पुरतं असल्याचं बोललं जातंय. '' ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही सीरिज 'द मॅरीड वुमन' या कांदबरीवर बेतलेली असून त्यात प्रेमकथा आहे. त्यासह 'देव डीडी २' येत आहे. पहिल्या सीझनचं उत्कंठावर्धक कथानक असल्यामुळे दुसऱ्या सीझनकडून असलेल्या अपेक्षा वाढल्या आहेत. अनुष्का शर्माची निर्मिती असलेली 'माई' सीरिज लवकर प्रदर्शित होईल. ही क्राइम थ्रिलर प्रकारात मोडणारी सीरिज असून साक्षी तन्वर मुख्य भूमिकेत असेल. या सीरिजमध्ये रायमा सेनसुद्धा महत्त्वपूर्ण भूमिकेत असल्याचं समजतंय. एमी पुरस्काराची मानकरी ठरलेल्या 'दिल्ली क्राइम' सीरिजचा दुसरा सीझन येणार असल्याचं बोललं जातंय. यात सुद्धा शेफाली शहाला मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार असल्याचं बोललं जातंय. 'फॉलन' या सीरिजच्या माध्यमातून सोनाक्षी सिन्हा ओटीटीवर पदार्पण करत असल्याची चर्चा रंगली आहे. यात ती महिला पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसेल असं कळतंय. 'हॅलो जी' ही हलक्याफुलक्या विषयावर भाष्य करणारी सीरिज येणार आहे. यामध्ये नायरा बॅनर्जी मुख्य भूमिकेत दिसेल. तसंच ''च्या तिसऱ्या सीझनचं चित्रीकरण सुरु झालं आहे. यामध्ये मुख्य भूमिकेत असलेली चारही पात्र काय धमाल करतील हे पाहणं औत्सुक्याचं असेल. प्रेक्षकांना महिलाकेंद्रीत सीरिज बघायला आवडत असल्याचं मिळालेल्या प्रतिसादावरुन सिद्ध होतं. सशक्त महिला पात्र प्रस्थापित करणं हे दिग्दर्शकाच्या दृष्टिकोनातून आव्हानात्मक असतं. तरीही प्रयत्न होत आहेत हे आशादायी चित्र आहे. प्रेक्षकांच्या अपेक्षा कैकपटीनं वाढलेल्या ओटीटीसारख्या माध्यमावर महिलाकेंद्रीत आशय सुपरहिट ठरत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. येत्या काळात महिलांच्या समस्या मांडणारा, त्यांच्या कष्टप्रद आयुष्यावर प्रकाश टाकणारा आणि त्यांनी मिळवलेलं यश साजरा करणारा आशय सीरिजच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3ch22bF