Full Width(True/False)

३२ कोटींच्या घराशिवाय या चार लग्झरियस गोष्टीही आहेत आलियाकडे

मुंबई- आलिया भट्टने आपल्या उत्कृष्ट अभिनयाने बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. यासोबतच आज ती बी-टाऊनमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे. आलियाने गेल्यावर्षी वांद्रे परिसरात सुमारे ३२ कोटी रुपयांचं घर विकत घेतलं. पण तुम्हाला माहीत आहे का की या घराशिवाय तिच्याकडे अशा बर्‍याच गोष्टी आहेत ज्याची किंमत कोट्यवधींच्या घरात आहेत. आज तिच्याकडे असणाऱ्या अल्ट्रा लक्झरी गोष्टींबद्दल जाणून घेऊ.. मुंबईत ३२ कोटींचं घर आलियाने नोव्हेंबर २०२० मध्ये मुंबईच्या वांद्रे येथे नवीन घर विकत घेतलं. मीडिया रिपोर्टनुसार, तिचं हे घर पाली हिल कॉम्प्लेक्सच्या पाचव्या मजल्यावर आहे. सुमारे २ हजार ४६० चौरस फूटाचं हे घर आहे. विशेष म्हणजे या इमारतीत रणबीर कपूर सातव्या मजल्यावर राहतो. एवढंच नाही तर असं सांगितलं जात आहे की, आलियाच्या घराचं इंटेरिअर गौरी खानने डिझाइन केलं आहे. बीएमडब्ल्यू -७ सीरिजची गाडी एका वेबसाइटनुसार, आलियाकडे लक्झरी सेडान बीएमडब्ल्यू -७ सीरिजची गाडी आहे. या गाडीची किंमत जवळपास १.३७ कोटी रुपये आहे. या व्यतिरिक्त तिच्याकडे ऑडी-ए ६ गाडीही आहे. ही तिची पहिली गाडी आहे जी तिने २०१५ मध्ये विकत घेतली होती. व्हॅनिटी व्हॅन बॉलिवूड स्टार्ससाठी व्हॅनिटी व्हॅन ही त्यांच्या दुसर्‍या घरासारखीच असते. कारण ते आपला बहुतेक वेळ शूटिंग दरम्यानच्या काळात व्हॅनिटी व्हॅनमध्ये घालवत असतात. आलिया भट्टचीही स्वतःची व्हॅनिटी व्हॅन आहे. तिची ही व्हॅनही गौरी खाननेच डिझाइन केली आहे. आलिया तिच्या व्हॅनिटी व्हॅनचे अनेक फोटो इन्स्टाग्राम शेअर करत असते. लंडनमध्ये आलिशान घर मुंबईव्यतिरिक्त लंडनमध्ये आलियाचं स्वतःचं घर आहे. तिने हे घर २०१८ मध्ये विकत घेतलं होतं. आलिया आणि तिची बहीण या घरात राहतात. या घराच्या किंमतीबद्दल आलियाने खुलासा केला नाही. यूकेच्या रिअल इस्टेट वेबसाइटनुसार, अभिनेत्रीच्या या घराची किंमत १०.४ कोटी ते ३१ कोटी रुपये आहे. लँड रोव्हर रेंज रोव्हर आलिया भट्टला गाड्यांचीही फार आवड आहे. तिच्याकडे एकाहून एक अद्यावरत गाड्यांचा ताफा आहे. एका वेबसाइटनुसार हिच्याकडे लँड रोव्हर रेंज रोव्हर वोग आहे, या गाडीची किंमत १.७४ कोटी रुपये आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3q0T6uG