नवी दिल्लीः नवीन वर्षाचे जोरदार स्वागत करण्यात आले आहे. ई-कॉमर्स वेबसाइट वर आकर्षक डिस्काउंट आणि डिल्स ऑफर केले जात आहेत. अॅमेझॉनवर स्मार्टफोन्सला स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे. ८ जानेवारी पासून ई-कॉमर्स वेबसाइट्सवर Amazon सेलचे आयोजन करण्यात आले आहे. हा सेल १२ जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. वाचाः ओप्पोच्या सेलमध्ये HDFC बँक, ICICI बँक आणि SBI बँकेच्या कार्ड्ससोबत शॉपिंग केल्यास १० टक्के इंस्टेंट डिस्काउंट दिला जात आहे. याशिवाय, नो-कॉस्ट ईएमआय, एक्सचेंज ऑफर आणि प्रीपेड ऑफर सुद्धा मिळणार आहे. ओप्पोच्या कोणत्या फोनवर किती सूट मिळत आहे. जाणून घ्या. वाचाः ला या सेलमध्ये ९ महिन्यांच्या नो-कॉस्ट ईएमआयवर खरेदी करण्याची संधी आहे. २० हजार ९९० रुपयांच्या ऐवजी १६ हजार ९९० रुपयांत हा फोन खरेदी करता येवू शकतो. याचप्रमाणे ओप्पो एफ १७ प्रो स्पेशल एडिशनला २६ हजार ९९० रुपयांऐवजी २१ हजार ४९० रुपयांत खरेदी करता येवू शकतो. या फोनमध्ये ६.४ इंचाचा सुपर अमोलेड डिस्प्ले दिला आहे. वाचाः >> ओप्पो ए५३ हँडसेटला या सेलमध्ये १५ हजार ९९० रुपयांच्या ऐवजी १२ हजार ९९० रुपयांत खरेदी करता येवू शकते. >> ओप्पो फाइंड एक्स २ ला ६४ हजार ९९० रुपयांत खरेदी करता येवू शकते. या फोनवर अतिरिक्त १३ हजार रुपयांचा प्रीपेड ऑफर दिला जात आहे. >> AI ड्यूल रियर कॅमेऱ्याचा ओप्पो ए १२ ला ११ हजार ४९० रुपयांत खरेदी करण्याची संधी या सेलमध्ये मिळत आहे. या फोनवर अतिरिक्त २ हजार रुपयांची सूट मिळत आहे. >> ओप्पो ए १५ स्मार्टफोनला या सेलमध्ये ९ हजार ४९० रुपयांत खरेदी करता येवू शकते. हँडसेटला ६ महिन्यांपर्यंत नो कॉस्ट ईएमआय दिला आहे. >> ओप्पो एफ १७ प्रो ला २१ हजार ४९० रुपयांत खरेदी करण्याची संधी आहे. याशिवाय ९ महिन्यांपर्यंत नो कॉस्ट ईएमआय पर्याय आहे. >> ओप्पो ए ११ च्या स्मार्टफोनमध्ये ड्यूल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. या फोनला ८ हजार ४९० रुपयांत खरेदी करण्याची संधी आहे. >> याशिवाय, 4000mAh बॅटरीचा ओप्पो ए१के स्मार्टफोनला ७ हजार ९९० रुपयांत खरेदी करता येवू शकते. ए१५ एसच्या ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेच्या फोनला ११ हजार ४९० रुपयांत तर ओप्पो एस५ एस ला ८ हजार ९९० रुपयात आणि ओप्पो रेनो ४ प्रोला ३४ हजार ९९० रुपयांत खरेदी करता येवू शकते. >> स्मार्टफोनशिवाय, ओप्पो वॉच सीरीजला सुद्धा या सेलमध्ये १९ हजार ९९० रुपयात खरेदी करता येवू शकते. ओप्पो वॉच २१ दिवसांची बॅटरी लाइफ ऑफर करीत असल्याचा दावा कंपनीने केला आहे. >> ओप्पो Enco W11 इयरबड्स ला १९९९ रुपये, Enco W31 ला २९९९ रुपये, Enco W51 ला ४९९९ रुपये, आणि Enco M31 ला १७९९ रुपयांत खरेदी करता येवू शकते. वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/39f9wJ5