मुंबई: अभिनेत्री कंगना रणौत आणि तिची बहीण या दोघींनी विशिष्ट समुदाय आणि धर्माविषयी सोशल मीडियावर आक्षेपार्ह वक्तव्ये करून त्या समुदायाचा दहशतवादी म्हणून उल्लेख केला, अशा आरोपांविषयीच्या चौकशीसाठी आज वांद्रे पोलिस ठाण्यात दाखल झाली. मुंबई पोलिसांनी यापूर्वी तीन वेळा कंगना आणि रंगोली यांना चोकशीसाठी समन्स पाठवले होते. मात्र दोघींनीही कारणं सांगून चौकशीसाठी हजर राहण्यास असमर्थता दर्शवली होती. म्हणून गेल्या सुनावणी दरम्यान कोर्टानं कंगनाला मुंबईत परतण्याची तारीख विचारली होती. अखेर आज ती चौकशीसाठी वांद्रे पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. काय आहे प्रकरण?कंगना आणि तिच्या बहिणीविरोधात भारतीय दंड विधान संहिता कलम २९४ अ आणि १५३ अ या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय.. धार्मिक भावना दुखावल्याबद्दल कंगनाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंगनावर दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्यासाठी तिनं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, न्यायालयानं कंगनाला मुंबई पोलिसांना चौकशीसाठी सहकार्य करण्याचे आदेश दिले होते. कंगनावर दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्यासाठी तिनं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, न्यायालयानं कंगनाला मुंबई पोलिसांना चौकशीसाठी सहकार्य करण्याचे आदेश दिले होते.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3q0gIQm