Full Width(True/False)

Samsung Galaxy S21 ची प्री-बुकिंग सुरू, ३८४९ रुपयांचा फोन कव्हर फ्री

नवी दिल्लीः दक्षिण कोरियाची स्मार्टफोन कंपनी १४ जानेवारी रोजी इवेंट मध्ये सॅमसंग गॅलेक्सी एस२१ सीरीजला लाँच करणार आहे. कंपनी नवीन गॅलेक्सी एस२१ सीरीज अंतर्गत Galaxy S21, आणि Ultra स्मार्टफोन लाँच करणार आहे. कंपनीने गॅलेक्सी एस २१ डिव्हाइसेजसाठी प्री-बुकिंग घेणे सुरू केले आहे. प्री बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना कंपनी ३ हजार ८४९ रुपयांचा कव्हर फ्री देणार आहे. वाचाः सॅमसंग गॅलेक्सी एस २१ अल्ट्रा कंपनीची एस सीरीज अंतर्गत लाँच होणारा पहिला फोन आहे जो एस पेन सोबत येणार आहे. आतापर्यंत S-Pen केवळ Galaxy Note आणि Tab सीरीज सोबत येत होता. वाचाः Galaxy S21 series च्या फोनला प्री ऑर्डर करण्याची पद्धत. >> इच्छूकांनी सॅमसंग इंडियाच्या ई-स्टोर www.samsung.com किंवा Samsung Shop App वर जावू शकता. >> या ठिकाणी युजर्संना बेसिक डिटेल्स जसे, नाव, मोबाइल नंबर, ईमेल आणि पिनकोड भरावे लागणार आहे. >> आवश्यक डिटेल्स भरल्यानंतर सॅमसंग इंडिया युजर्सला डिव्हाइसला प्री रिजर्व करण्याचा ऑप्शन देणार आहे. >> Pre-Reserve Now बटनावर क्लिक केल्यानंतर कार्टमध्ये Next Galaxy VIP Pass दिसेल. >> ग्राहकांना एक वेलकम ई-मेल मिळेल. ज्यात व्हीआयपी पास रिसिव करण्यासाठी स्टेप्स असतील. >> रिजर्वेशन प्रोसेर पूर्ण करण्यासाठी ग्राहकांना २ हजार रुपये द्यावे लागतील. >> हे २ हजार रुपये फोनच्या किंमतीतून वजा केले जातील. वाचाः ग्राहक व्हीआयपी पासला कधीही रद्द करून पूर्ण रिफंड मिळवू शकतात. ग्राहकांना प्री बुकिंग वर ३ हजार ८४९ रुपयांच्या किंमतीचा एक फोन फ्री मिळणार आहे. गॅलेक्सी एस २१ सीरीजला प्री बुक करण्याचा हा ऑप्शन १४ जानेवारी पर्यंत उपलब्ध असणार आहे. सॅमसंग गॅलेक्सी एस २१ आणि गॅलेक्सी एस २१ प्लस प्री ऑर्डर केल्यास ग्राहकांना SmartTag आणि Galaxy Buds Live फ्री मिळणार, असा नुकताच एका रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला होता. गॅलेक्सी एस २१ सीरीजला १४ जानेवारी रोजी अनपॅक्ड २०२१ इवेंट मध्ये लाँच केले जाणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री साडे आठच्या सुमारास या कार्यक्रमाची लाइव्हस्ट्रिमिंग Samsung.com वर सुरू होणार आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3hVbYbQ