Full Width(True/False)

Jio vs Airtel: २५० रुपयांपेक्षा कमी किंमतीत बेस्ट प्रीपेड प्लान

नवी दिल्लीः देशातील टेलिकॉम कंपन्या आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या किंमतीचे वेगवेगळे प्लान ऑफर करीत असतात. या कंपन्या जास्तीत जास्त प्लानमध्ये फ्री कॉलिंग, रोज 100SMS देतात. यात केवळ फरक हा डेटा मध्ये असतो. आम्ही तुम्हाला या ठिकाणी रिलायन्स जिओ आणि एअरटेल या दोन कंपन्यांचे २५० रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळणाऱ्या खास प्रीपेड प्लानसंबंधी माहिती देत आहोत. वाचाः रिलायन्स जिओ जिओचा २४९ रुपयांचा प्लान असून यात रोज 100SMS आणि रोज 2GB डेटा दिला जातो. या प्लानची वैधता २८ दिवसांची आहे. या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा ग्राहकांना मिळतो. तसेच जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन सुद्धा दिले जाते. जर तुम्ही जिओचे ग्राहक असाल आणि तुमचे कमी बजेट असेल तर तुम्ही १९९ रुपयांचा प्लान घेवू शकता. या प्लानमध्ये ग्राहकांना रोज १.५ जीबी डेटा, रोज शंभर एसएमएस आणि फ्री कॉलिंग दिली जाते. या प्लानची वैधता सुद्धा २८ दिवसांची आहे. वाचाः याचप्रमाणे ग्राहकांसाठी १५० रुपयांचा प्लान सुद्धा आहे. जिओच्या या प्लानमध्ये रोज १ जीबी डेटा मिळतो. या प्लानमध्ये फ्री कॉलिंग, रोज १०० एसएमएस मिळतो. या प्लानची वैधता २४ दिवसांची आहे. या दोन्ही प्लानमध्ये जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते. वाचाः एअरटेल जिओ प्रमाणे एअरटेलकडे सुद्धा २४९ रुपयांचा प्लान आहे. कंपनी या प्लानमध्ये रोज १.५ जीबी डेटा, रोज फ्री १०० SMS आणि फ्री कॉलिंग देते. या प्लानची वैधता २८ दिवसांची आहे. या प्लानमध्ये एअरटेल एक्स्ट्रीम प्रीमियम, हेलोट्यून्सचे फ्री अॅक्सेस, विंक म्यूझिक, १ वर्षासाठी फ्री ऑनलाइन कोर्स आणि FASTag खरेदीवर १०० रुपयांची कॅशबॅक ऑफर मिळते. वाचाः याचप्रमाणे कंपनीचा २१९ रुपयांचा प्लान आहे. यात रोज १ जीबी डेटा सोबत रोज १०० एसएमएस आणि फ्री कॉलिंगची सुविधा दिली जाते. या प्लानची वैधता २८ दिवसांची आहे. तसेच या प्लानमध्ये फ्री हेलोट्यून्स, विंक म्यूझिकचे अॅक्सेस आणि एअरेटल एक्स्ट्रीम सर्विसचे अन्य फायदे दिले जाते. या बेनिफिट्स सोबत कंपनी १९९ रुपयांचा प्लान सुद्धा ऑफर करते. या प्लानची वैधता २४ दिवसांची आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/35llO1A