Full Width(True/False)

Realme: 64MP कॅमेरा, 65W फास्ट चार्जिंग स्मार्टफोनवर १० हजारांची सूट

नवी दिल्लीः Realme ने आपल्या वेबसाइटवर विंटर सेल सुरू केला आहे. हा सेल ५ जानेवारीपासून सुरू झाला असून आज या सेलचा अखेरचा दिवस आहे. ग्राहकांना या सेलमध्ये रियलमीच्या स्मार्टफोनवर बंपर सूट दिली जात आहे. सर्वात मोठा डिस्काउंट कंपनी स्मार्टफोनवर देत आहे. या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ८६५ प्रोसेसर आणि ६५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट, तसेच ६४ मेगापिक्सलचा क्वॉड कॅमेरा दिला आहे. वाचाः Realme X50 Pro च्या 8GB+128GB आणि 12GB+256GB व्हेरियंट्सवर १० हजारांची सूट दिली जात आहे. त्यामुळे ग्राहकांना हा फोन ४१ हजार ९९९ रुपयांऐवजी ३१ हजार ९९९ रुपयात आणि ४७ हजार ९९९ रुपयांऐवजी ३७ हजार ९९९ रुपयांत खरेदी करण्याची संधी मिळत आहे. ग्राहक याला मॉस ग्रीन आणि रस्ट रेड या दोन कलर ऑप्शन मध्ये खरेदी करू शकतात. Realme X50 Pro ची सुरुवातीची किंमत ३१ हजार ९९९ रुपये आहे. कारण, या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ८६५ प्रोसेसर 65W फास्ट चार्जिंग सपोर्ट, 90Hz सुपर AMOLED स्क्रीन आणि 64MP क्वॉड कॅमेरा सारखे फीचर्स दिले आहेत. वाचाः OnePlus 8T 5G ची किंमत ४२ हजार ९९९ रुपये आहे. यात ८६५ प्रोसेसर आणि ६५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट 120Hz फ्यूइड डिस्प्ले आणि 48MP क्वॉड कॅमेरा सेटअप यासारखे फीचर्स दिले आहेत. म्हणजेच दोन्ही फोनची तुलना केल्यास या फोनमध्ये जास्त फरक दिसत नाही. Realme X50 Pro चे बाकीचे फीचर्स पाहिल्यास हा फोन Realme UI वर काम करतो. वाचाः या फोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेट सोबत 6.44-इंच फुल-HD+ (1,080x2,400 पिक्सल) डिस्प्ले दिला आहे. यात 12GB पर्यंत LPDDR5 रॅम आणि 256GB पर्यंत UFS 3.0 स्टोरेज दिला आहे. तसेच ऑक्टा-कोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 865 5G प्रोसेसर दिला आहे. या फोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि ३२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. तसेच ८ मेगापिक्सलचा आणखी एक सेल्फी कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 4,200mAh बॅटरी दिली आहे. वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3bjj1K9