Full Width(True/False)

Realme चा विंटर सेल सुरू, स्मार्टवॉच, वायरलेस ईयरबड्सवर जबरदस्त सूट

नवी दिल्लीः Realme ने आपल्या ग्राहकांसाठी स्पेशल विंटर सेलचे आयोजन केले आहे. या सेलला ५ जानेवारी पासून सुरूवात झाली आहे. हा सेल ९ जानेवारी पर्यंत सुरू राहणार आहे. या सेलचे आयोजन कंपनीने आपल्या अधिकृत वेबसाइटवर, अॅमेझॉन इंडिया, फ्लिपकार्ट आणि मिंत्रा वर केले आहे. वाचाः ५ जानेवारी पासून सुरू करण्यात आलेल्या या सेलमध्ये , Air Pro आणि Realme Buds Wireless Pro यासारख्या अनेक उत्पादनांवर डिस्काउंट दिला जात आहे. या ठिकाणी जाणून घ्या टॉप ऑफर्स कंपनी Realme Watch Basic ला रियलमीची साइट, फ्लिपकार्ट आणि मिंत्रार ५०० रुपयांचा डिस्काउंट देत आहे. त्यामुळे ग्राहकांना या सेलमध्ये ३ हजार ४९९ रुपयांत खरेदी करण्याची संधी आहे. तसेच रियलमीच्या साइटवरून ही वॉच खरेदी केल्यास एक वॉच स्ट्रॅप फ्री मिळणार आहे. वाचाः Realme Buds Wireless Pro Earbuds वर ५०० रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. ग्राहकांना या प्रोडक्टला अॅमेझॉन आणि रियलमीची वेबसाइटवरून खरेदी केल्यास त्यांना ३४९९ रुपयांत हे खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. Realme Buds Air Pro वर सुद्धा ५०० रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. ग्राहकांना या डिव्हाइसला रियलमीची साईट किंवा फ्लिपकार्टवरून खरेदी केल्यास ४४९९ रुपयांत खरेदी करता येवू शकते. वाचाः Realme Buds Air Neo वर या सेलमध्ये ८०० रुपयांचा डिस्काउंट ऑफर दिला जात आहे. ग्राहकांना ऑडियो प्रोडक्टला फ्लिपकार्ट, रियलमीच्या वेबसाइटवरून तसेच मिंत्राच्या वेबसाईटवरून खरेदी केल्यात त्यांना २१९९ रुपयांत खरेदी करता येवू शकते. Realme Buds Q वर ४०० रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. रियलमीची वेबसाइट, फ्लिपकार्ट आणि मिंत्रावरून खरेदी केल्यास ११९९ रुपयांत खरेदीची संधी मिळणार आहे. वाचाः याचप्रमाणे या सेलमध्ये रियलमी इलेक्ट्रिक टूथब्रश मिड M1 ला १४९९ रुपयांत खरेदी करता येवू शकते. यावर ५०० रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/38kG0Cs