मुंबई- आणि या दोघी खूप चांगल्या मैत्रिणी आहेत हे तर साऱ्यांनाच माहीत आहे. दोघीही एकमेकांसाठी नेहमीच ठामपणे उभ्या राहताना दिसतात. आयुष्य मनमुरादपणे जगणं असो की कठीण प्रसंगी एकमेकांना धीर देणं असो दोघींनी एकमेकींची साथ कधीच सोडली नाही. आता दोघींचा एक व्हॉट्सअप चॅटचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या संभाषणात दोघीही एकमेकांचं मनोबल उंचावतानाच एकमेकांवर टीका करतानाही दिसत आहेत. आलू अर्थात आलिया आणि आकांक्षाचं हे चॅट फारच मजेशीर आहे. हा स्क्रीनशॉट व्हायरल झाल्यानंतर पुन्हा एकदा सोशल मीडियावर दोघींच्या मैत्रीच्या चर्चांना उधाण आलं आहे. हे व्हॉट्सअॅप चॅट आकांक्षाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केलं होतं. या चॅटमध्ये दोघी कोणताही सेलिब्रिटीवाला पडदा न ठेवता एकमेकींशी बोलत होते. गप्पा सुरू असताना आकांक्षा तिचा एक फोटो शेअर करते आणि म्हणते की ती फारच जाड लॉलीपॉपसारखी दिसत आहे. तर यावर उत्तर देताना आलिया म्हणते ती अजिबातच लॉलीपॉपसारखी दिसत नसून सुंदर दिसत आहे. बेस्ट फ्रेंडची बिंधास्त जोडी 'गिल्टी' सिनेमात काम केलेल्या आकांक्षाने हा स्क्रीनशॉट शेअर करताना लिहिले की, इतर प्रत्येक बेस्ट फ्रेंडप्रमाणे आम्हाही एकमेकांना प्रोत्साहन देत असतो. आता आलिया आणि आकांक्षाचं हे संभाषण पाहून तुम्हालाही तुमचा सर्वात जवळचा मित्र किंवा मैत्रीण नक्कीच आठवली असणार. 'आलिया इतरांसाठी व्यग्र, माझ्यासाठी नेहमीच फ्री' गेल्या वर्षी फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने आलियाने तिच्या यूट्यूब चॅनलवर आकांक्षासोबतचा एक व्हिडिओ शेअर केला होता. यात दोघी आपल्या मैत्रीबद्दल बोलत होत्या. आकांक्षाने व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की, 'आलिया काळानुसार खूप परिपक्व झाली आहे. यामुळेच तिला अडीअडचणीच्या काळात कोणत्याही थेरपिस्टकडे जावं लागत नाही. आकांक्षा म्हणाली की आलिया इतरांसाठी कितीही व्यग्र असली तरी माझ्यासाठी तिच्याकडे नेहमीच वेळ असतो.'
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3ojyWeZ