नवी दिल्लीः Xiaomi चे सब ब्रँड पोकोचे स्मार्टफोन्स भारतात चांगलेच प्रसिद्ध आहेत. कंपनी आता पोकोच्या दोन स्मार्टफोनची किंमत कमी करण्यात येत असल्याची घोषणा केली आहे. आणि या दोन फोनच्या किंमतीत कपात करण्यात आली आहे. जाणून घ्या फोनची किंमत व त्यांची खास वैशिष्ट्ये. वाचाः POCO M2 ची किंमत आता भारतात ९ हजार ९९९ रुपयांपासून सुरू होणार आहे. याआधी या फोनची किंमत १० हजार ९९९ रुपये होती. POCO M2 च्या १२८जीबी स्टोरेजच्या फोनच्या किंमतीत सुद्धा १५०० रुपयांची कपात करण्यात आली आहे. आता हा फोन १० हजार ९९९ रुपयांना खरेदी करता येवू शकतो. POCO C3 या स्मार्टफोनच्या ३ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत आता७ हजार ४९९ रुपयांपासून सुरू होते. ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत आता ८ हजार ४९९ रुपये झाली आहे. आधी या फोनची किंमत ८ हजार ९९९ रुपये होती. वाचाः POCO M2 मध्ये ६.३ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये MediaTek Helio G80 प्रोसेसर दिला आहे. या फोनमध्ये चार रियर कॅमेरे दिले आहेत. प्रायमरी कॅमेरा १३ मेगापिक्सलचा आहे. तर ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड लेन्स दिला आहे. ५ मेगापिक्सलचा तिसरा कॅमेरा दिला आहे. २ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स दिला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. पोकोच्या या फोनमध्ये पॉवर साठी 5,000 mAh ची बॅटरी दिली आहे. १८ वॉटची फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. वाचाः POCO C3 मध्ये ६.५३ इंचाचा एचडी प्लस एलसीडी डिस्प्ले दिला आहे. स्मार्टफोनमध्ये ४ जीबी रॅम सोबत ऑक्टा-कोर MediaTek Helio G35 प्रोससेर दिला आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3olo8wX