Full Width(True/False)

WhatsApp अकाउंट डिलीट करण्याची 'स्टेप बाय स्टेप' पद्धत माहिती आहे का?

नवी दिल्लीः जर तुम्ही चा वापर करीत नसाल किंवा जर तुमचे व्हॉट्सअॅप डेटा करप्ट झाला असेल तर व्हॉट्सअॅप अकाउंट डिलीट करता येवू शकते. WhatsApp ने नुकतीच एक नवीन पॉलिसी आणली आहे. या पॉलिसीमुळे व्हॉट्सअॅपचा चॅट डेटा फेसबुक सोबत शेयर केला जाणार आहे. त्यामुळे अनेक जण व्हॉट्सअॅप सोडण्याचा विचार करीत आहेत. तसेच काही जण नवीन डेटा पॉलिसीमुळे दुसरे मेसेजिंग अॅपकडे वळत आहेत. वाचाः व्हॉट्सअॅप अकाउंट डिलीट करणे म्हणजे तुमचा आतापर्यंतचा सर्व डेटा कायमचा डिलीट करणे होय. जर पुन्हा तुम्हाला अकाउंट रिअॅक्टिवेट करायचा असेल तर तुमचा डिलीट झालेला अकाउंटचा डेटा रिकव्हर होणार नाही. वाचाः जर तुम्ही व्हॉट्सअॅपला सोडून दुसरे मेसेजिंग अॅप जसे सिग्नल आणि टेलिग्राम जॉइन करायचे असेल तर व्हॉट्सअॅप अकाउंट डिलीट करावे लागेल. परंतु, व्हॉट्सअॅपपासून सुटका कशी मिळणार आहे. जाणून घ्या या संबंथी स्टेप बाय स्टेप पद्धत. वाचाः व्हॉट्सअॅप अकाउंट कायमचे डिलीट करण्याची पद्धत >> सर्वात आधी आपल्या फोनवर व्हॉट्सअॅप ओपन करा. >> आता सर्वात वरच्या बाजुला दिसत असलेल्या तीन डॉटवर टॅप करा. >> यानंतर सेटिंग्समध्ये जा. >> आता अकाउंटवर टॅप करा. >> Account मध्ये दिसत असलेल्या Delete my account ऑप्शनवर टॅप करा. >> यानंतर कंट्री कोड सोबत आपला फोन नंबर एन्टर करा. >> आता Delete my account वर टॅप करा. >> आता अकाउंट डिलीट करण्यासाठी विचारल्यावर इंडिकेट करा. >> पुन्हा Delete my account वर टॅप करा. >> पुन्हा एकदा तुम्हाला कन्फर्म करण्यासाठी Delete my account वर टॅप करा. वाचाः फायनल पेजवर Delete my account बटनावर टॅप केल्यानंतर तुमचे अकाउंट आणि संपूर्ण डेटा डिलीट होईल. जर पुन्हा व्हॉट्सअॅप जॉइन करायचे असेल तर तुम्हाला नवीन अकाउंट बनवावे लागेल. त्यामुळे अकाउंट डिलीट करण्याआधी आपला आवश्यक व्हॉट्सअॅप डेटा, चॅट, मीडिया आणि डॉक्यूमेंट्सचे बॅकअप जरूर घ्या. तसेच व्हॉट्सअॅप कॉन्टॅक्ट्सला माहिती द्यावी लागेल की, तुम्ही दुसरे मेसेजिंग अॅप जॉइन केले की नाही. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3hY0g08