Full Width(True/False)

जेव्हा सैफ अली खानच्या एक्स-वाइफला बहिणीने दिल्या शुभेच्छा

मुंबई- बॉलिवूड अभिनेता याची पहिली पत्नी अभिनेत्री अमृता सिंह यांचा मंगळवारी ९ फेब्रुवारी रोजी वाढदिवस होता. आईच्या जन्मदिनी सारा अली खानने अमृता यांना एक खास भेट दिली. मी कायमची तुझ्यासोबत राहीन, असं म्हणत तिने अमृता यांच्यासाठी सोशल मीडियावर एक मेसेज लिहिला होता. त्यासोबतच सैफची बहीण हिनेही सोशल मीडियावर आपल्या पहिल्या वहिनीला अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत. सबाने सारा आणि इब्राहिमसोबतचा अमृता यांचा फोटो कोलाज करून इन्स्टा स्टोरीवर शेअर केला. सबाने स्टोरीवर टाकले जुने फोटो सबाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर अमृता यांचे तरुणपणातले जुने फोटो शेअर केले. त्यासोबतच बाकीच्या दोन फोटोत अमृता या त्यांची दोन्ही मुलं सारा आणि इब्राहिमसोबत दिसत आहेत. या फोटोंना शेअर करताना तिने यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राजीव कपूर यांच्या निधनावरही व्यक्त केलं दुःख सबाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर सैफची दुसरी पत्नी करिना कपूरचे काका राजीव कपूर यांच्या निधनावरही दुःख व्यक्त केलं होतं. तिने राजीव यांचा फोटो शेअर करत लिहिलं की, 'राजीव कपूर तुमची आठवण येईल.' शर्मिला टागोर यांची मुलगी सबा कायमच चित्रपटसृष्टीच्या झगमगाटापासून दूर राहते. ती मीडिया आणि इतर कार्यक्रमांनादेखील फार कमी हजेर राहते. पण ती कुटुंबासोबत कायम जोडलेली असते. नेहमी त्यांच्या कुटुंबियांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3cYE7hK