Full Width(True/False)

वडिलांच्या अफेअरवर भडकली होती पूजा, सावत्र आईचा करायची द्वेष

मुंबई: अभिनेत्री २४ फेब्रुवारीला ४९ वा वाढदिवस साजरा करत आहे. बऱ्याच काळापासून चित्रपटांपासून दूर राहिलेल्या पूजानं मागच्याच वर्षी 'सडक २' या चित्रपटातून कमबॅक केलं. या चित्रपटात तिची सावत्र बहीण आलिया भट्ट मुख्य भूमिकेत होती. अलिकडच्या काळात आणि पूजा भट्ट यांचं नातं सुधारलं असलं तर एक वेळ अशीही होती की, या बाप-लेकीच्या नात्यात खूप दुरावा आला होता. पूजा भट्ट ही महेश भट्ट आणि त्याची पहिली पत्नी किरण यांची मुलगी आहे. पण जेव्हा महेश भट्ट यांनी पूजाला यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या अफेअर बद्दल सांगितलं. तेव्हा पूजा खूप चिडली होती. इतकंच नाही तर सोनी राझदान यांना तर ती स्वतःची सर्वात मोठी शत्रू मानत असे. आपले वडील आणि सोनी राझदान यांच्या नात्याविषयी बोलताना एका मुलाखतीत पूजा म्हणाली होती, 'त्यांनी माझ्यापासून कधीच कोणतीच गोष्ट लपवली नाही. एका रात्री ते आले त्यावेळी मी झोपले होते. रात्रीचा दिड वाजत आला होता. त्यांनी मला गाढ झोपेतून उठवलं आणि सांगितलं, पूजा मी दुसऱ्या महिलेसोबत आहे आणि माझं तिच्यासोबत अफेअर सुरू आहे आणि मला वाटतं हे तुला माहीत असायला हवं. तोपर्यंत ही गोष्ट माझ्या आईला सुद्धा माहीत नव्हती.' पूजा सांगते, 'त्यांनी माझ्या आईला सोडलं त्याासाठी मी त्यांच्यावर रागावले होते आणि मी माझी नाराजी जाहिर केली होती. पण माझ्या वडिलांना माझ्यापासून दूर केलं म्हणून मी सोनी राझदान यांचा तिरस्कार करत होते. असाही एक काळ होता जेव्हा त्यांचं नाव ऐकल्यावरही मला चीड येत असे. हे सर्व यासाठी झालं होतं कारण माझ्या आई-वडीलांना समजलं होतं की, ते दोघं आता जास्त काळ एकमेकांसोबत राहू शकत नाहीत. ते आजही एकमेकांचे चांगले मित्र आहेत. बाबा नेहमी आमच्या घरी येतात.' सोनी राझदानसोबतच्या नात्याविषयी ऐकल्यावर पूजाची प्रतिक्रिया काय होती याविषयी महेश भट्ट यांनी सिमी गरेवालच्या मुलाखतीत सांगितलं होतं. ते म्हणाले,'मी तिच्याकडे गेलो आणि तिला सांगितलं की, तुझे वडील म्हणजे मी आणि ही मुलगी आमचं दोघंचं अफेअर आहे. त्यावर ती फक्त माझ्याकडे पाहत राहिली आणि तिनं मान हलवली. मला समजलंच नाही की, तिच्या या वागण्याचा अर्थ काय होता.'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2MiOq5e