Full Width(True/False)

सुष्मिता-रोहमनचं ब्रेकअप? 'त्या' पोस्टमुळं चर्चेला उधाण

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री आणि माजी मिस युनिव्हर्स सुष्मिता सेन नेहमीच तिच्या आयुष्याबद्दल मोकळेपणानं बोलते. एवढंच नाही तर जेव्हा तिच्या रिलेशनशिपची गोष्ट समोर आली तेव्हाही तिनं कोणतीही गोष्ट न लपवता रोहमन शॉलसोबतचं तिचं नातं सर्वांसमोर मान्य केलं. सोशल मीडियावरही ती नेहमीच रोहमनसोबतचे फॅमिली, व्हेकेशन तसेच जीम वर्कआउटचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. पण इन्स्टाग्रावर नुकत्याच शेअर केलेल्या एका पोस्टमुळे सुष्मिता पुन्हा चर्चेत आली आहे. मागच्या काही काळापासून चाहत्यांना सुष्मिताच्या लग्नाबाबत उत्सुकता आहे. सध्या व्हॅलेंटाइन विक सुरू आहे आणि असं असताना सुष्मिताच्या त्या पोस्टनं चाहते सुद्धा हैराण झाले आहेत. तिच्या या पोस्टवरून तिचं आणि रोहमनचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू आहेत. सुष्मितानं तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात लिहिलं आहे, 'समस्या ही असते की, तो बदलेल असं महिलांना वाटत असतं पण तो बदलत नाही आणि पुरुष हा विचार करून चूक करतात की, ती कधीच सोडून जाणार नाही पण ती जाते.' या फोटोसोबत सुष्मितानं कॅप्शन सुद्धा दिलं आहे ज्यात तिनं लिहिलं, 'या वरून समजतं की, तो बदलणार नाही आणि ती सोडून जाईल.' सुष्मिताच्या या पोस्टनंतर तिचे चाहते सुद्धा हैराण झाले आहेत. सुष्मिता आणि रोहमनचं ब्रेकअप झालं आहे का? असा प्रश्न आता चाहत्यांना पडला आहे. विशेष म्हणजे रोहमन शॉलनं सुद्धा तिची ही पोस्ट लाइक केली आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3rI2EeZ