नवी दिल्लीः ओप्पो सध्या आपले नवीन स्मार्टफोन वर जोरात काम करीत आङे. फोनच्या लाँचिंग डेट संबंधी कंपनीकडून अद्याप काहीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. परंतु, या दरम्यान ओप्पो 5G ला जपानच्या एक ऑपरेटर AU Kiddi ने स्पेसिफिकेशन आणि फोटो सोबत लिस्ट केले आहे. वाचाः Oppo A54 5G चे खास फीचर्स ओप्पोच्या या फोनमध्ये 1080x2400 पिक्सल रेजॉलूशन सोबत ६.५ इंचाची IPS LCD स्क्रीन दिली आहे. साइड फेसिंग फिंगरप्रिंट स्कॅनर आणि एआय फेस अनलॉक सोबत येणाऱ्या या फोनमध्ये अँड्रॉयड ११ वर बेस्ड कलर ओएस ११ दिले आहे. ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी इंटरनल स्टोरेजच्या या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ४८० चिपसेट दिले आहे. वाचाः फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर सोबत एक ८ मेगापिक्सलचा सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा सेन्सर दिला आहे. सेल्फीसाठी यात १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. मायक्रो एसडी कार्डसोबत येणाऱ्या या फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी दिली आहे. ही बॅटरी १८ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट सोबत येते. कनेक्टिविटी साठी या फोनमध्ये वाय फाय ८०२.११एसी, ब्लूटूथ ५.०, यूएसबी सी आणि ३.५ एमएम हेडफोन जॅक दिले आहेत. वाचाः डिझाइन मध्ये ओप्पो A54 5G जवळपास Oppo A93 5G सारखाच आहे. ओप्पो ए ९३ ५ जी ला कंपनीने गेल्या महिन्यात चीनमध्ये लाँच केले होते. फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर सोबत दोन २ मेगापिक्सलचे कॅमेरे दिले आहेत. फोनच्या किंमती संदर्भात कंपनीने अद्याप कोणतीही माहिती दिली नाही. परंतु, हा फोन मे च्या अखेर पर्यंत जपानमध्ये लाँच केले जाऊ शकतो. फोनची विक्री जून मध्ये सुरू केली जाऊ शकते. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3bD1uLp