Full Width(True/False)

बॉलिवूडचं वेळापत्रक अखेर ठरलं ; जाणून घ्या चित्रपटांच्या Release Dates

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या सिनेमांना प्रेक्षकांचा मिळालेला प्रतिसाद आणि करोनाच्या परिस्थितीत होत चाललेली सुधारणा पाहून अनेक चित्रपट निर्माते आपल्या सिनेमांच्या प्रदर्शनाच्या तारखा जाहीर करत आहेत. चित्रपटगृहं १०० टक्के प्रेक्षकक्षमतेने सुरू करण्याच्या परवानगीनंतर निर्माते त्यांचे चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित करायचं ठरवत आहेत. काही दिवसांपासून अनेक मोठ्या सिनेमांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. या स्पर्धेत हॉलिवूडचे सिनेमेही मागे नाहीत.

सिनेसृष्टी हळूहळू पूर्वपदावर येऊ लागली आहे. अनेक हिंदी चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. बॉक्स ऑफिसवरचं वेळापत्रक ठरलेलं दिसत असून त्यानिमित्तानं बड्या कलाकारांच्या बिग बजेट सिनेमांची टक्कर बघायला मिळणार आहे.


बॉलिवूडचं वेळापत्रक अखेर ठरलं ; जाणून घ्या चित्रपटांच्या Release Dates

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या सिनेमांना प्रेक्षकांचा मिळालेला प्रतिसाद आणि करोनाच्या परिस्थितीत होत चाललेली सुधारणा पाहून अनेक चित्रपट निर्माते आपल्या सिनेमांच्या प्रदर्शनाच्या तारखा जाहीर करत आहेत. चित्रपटगृहं १०० टक्के प्रेक्षकक्षमतेने सुरू करण्याच्या परवानगीनंतर निर्माते त्यांचे चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित करायचं ठरवत आहेत. काही दिवसांपासून अनेक मोठ्या सिनेमांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. या स्पर्धेत हॉलिवूडचे सिनेमेही मागे नाहीत.



​बड्या कलाकारांचं पुनरागमन
​बड्या कलाकारांचं पुनरागमन

११ मार्चला राजकुमार राव आणि जान्हवी कपूर यांचा 'रुही' हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होईल. यानंतर त्याच्या पुढच्याच महिन्यात २ एप्रिलला अक्षयकुमारचा 'सूर्यवंशी' हे चित्रपट प्रदर्शित होण्याची चर्चा आहे. याबाबत कुठलीही अधिकृत घोषणा केली नाही. अक्षयकुमारचा 'बेल बॉटम' २८ मे, रणवीर सिंगचा '८३' ४ जूनला आणि अमिताभ बच्चन अभिनित 'झुंड' १८ जूनला चित्रपटगृहात येईल. २ जुलैला सिद्धार्थ मल्होत्राचा वॉर सिनेमा 'शेरशाह' मोठ्या पडद्यावर झळकेल. तर ९ जुलैला आयुषमान खुराना आणि वाणी कपूर यांचा रोमँटिक कॉमेडी असलेला 'चंदीगढ करे आशिकी' रिलीज होईल. अक्षयकुमार, सारा अली खान आणि धनुष यांचा 'अतरंगी रे' ऑगस्टच्या पहिल्या शुक्रवारी रिलीज होईल. यानंतर २७ ऑक्टोबरला रणवीर सिंग स्टारर 'जयेशभाई जोरदार' प्रदर्शित होईल.



​मोठ्या सणांना होणार मोठी टक्कर
​मोठ्या सणांना होणार मोठी टक्कर

यंदा अनेक मोठ्या सणांना बड्या बॉलिवूडपटांची टक्कर होणार आहे. यावर्षी जॉन अब्राहम आपला सिनेमा ईदला घेऊन येत सलमानशी स्पर्धा करणार आहे. १२ मेला सलमान खानचा बहुप्रतिक्षित सिनेमा 'राधे युवर मोस्ट वाँटेड भाई' रिलीज होणार आहे. तर जॉनचा 'सत्यमेव जयते २' १४ मेला रिलीज होणार आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर १३ ऑक्टोबरला एस. एस. राजमौली दिग्दर्शित चित्रपट 'आरआरआर' प्रदर्शित होणार आहे. त्यानंतर दोन दिवसांनी अजय देवगणचा दुसरा चित्रपट 'मैदान' सुद्धा चित्रपटगृहात येईल. दिवाळीत अक्षयकुमारचा 'पृथ्वीराज' या सिनेमाची टक्कर शाहिद कपूरच्या 'जर्सी' चित्रपटाशी होईल. हे दोन्ही सिनेमे ५ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहेत. नाताळाच्या दिवसांत रणबीर कपूर स्टारर 'ब्रम्हास्त्र' आणि आमिर खानचा 'लाल सिंग चढ्ढा' या सिनेमांमध्ये सामना रंगेल, अशी चर्चा आहे.



​हॉलिवूड सुद्धा स्पर्धेत
​हॉलिवूड सुद्धा स्पर्धेत

हॉलिवूड आणि दाक्षिणात्य सिनेमांची उत्तर भारतात असलेली मोठी प्रेक्षकसंख्या बॉलिवूडसाठी चिंतेचं कारण बनली आहे. 'फास्ट अँड फ्युरियस ९' या सिनेमाची फ्रेंचांयजी भारतीय प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. या सिनेमाची टक्कर 'बेल बॉटम' या सिनेमाशी आहे. दिवाळीमध्ये 'पृथ्वीराज' आणि 'जर्सी' या सिनेमांना 'इटरनल्स' आणि 'स्पायडरमॅन'च्या पुढील भागाशी सामना करावा लागेल. वर्षाच्या दुसऱ्या सहमाहीत मोठे दाक्षिणात्य सिनेमे सुद्धा प्रदर्शित होणार आहे. यात यश स्टारर 'केजीएफ चाप्टर २' १६ जुलैला तर प्रभासचा 'राधे श्याम' ३० जुलैला प्रदर्शित होणार आहे.

चित्रपट प्रदर्शनाच्या तारखा :



​चित्रपट प्रदर्शनाच्या तारखा
​चित्रपट प्रदर्शनाच्या तारखा

बंटी और बबली २ - २३ एप्रिल

राधे युवर मोस्ट वाँटेड भाई आणि सत्यमेव जयते - १४ मे

बेल बॉटम आणि फास्ट अँड फ्युरियस ९- २८ मे

८३ - ४ जून

अतरंगी रे- ६ ऑगस्ट

मैदान आणि हौसला रख - १५ ऑक्टोबर

पृथ्वीराज, जर्सी, स्पायडरमॅन आणि इटरनल्स - ५ नोव्हेंबर

संकलन :

प्रथमेश गायकवाड, विल्सन कॉलेज





from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3sgN4r9