Full Width(True/False)

Vivo S9 ची प्री-बुकिंग लाँच आधीच सुरू, Vivo S9e वरूनही उठणार पडदा

नवी दिल्लीः विवो एस ९ सीरीजची प्री बुकिंग चीनमध्ये कंपनीच्या वेबसाइटवर लाँच आधीच सुरू करण्यात आली आहे. अधिकृत लिस्टिंगवरून येणारा फोटो समोर आला आहे. ज्यात याची डिझाइनची माहिती उघड झाली आहे. याशिवाय, विवोने विबोवर नवीन सीरीज मध्ये लाँच करण्याचे म्हटले आहे. हा फोन विवो एस ९ चे टोन्ट डाउन व्हर्जन असू शकतो. विवो एस९ सीरीजला ३ मार्च रोजी लाँच करण्यात येणार आहे. वाचाः विवोची चीनच्या साइटवर प्री बुकिंग पेजवर विवो एस ९ च्या रियरला स्पष्टपणे पाहिले जाऊ शकते. फोनमध्ये आयफोन १२ सीरीज प्रमाणे फ्लॅट किनारे दिले आहे. याशिवाय, रेक्टांगुलर शेप मॉड्यूल मध्ये ट्रिपल रियर कॅमेरे सुद्धा आहेत. कॅमेरा मॉड्यूल पाहायला विवो एक्स ५० आणि काही दुसर्या विवो फोन्ससारखे दिसत आहेत. वाचाः याशिवाय, विवो ने चीनची मायक्रोब्लॉगिंग वेबसाइट विबोवर टीजर जारी करून याला दुजोरा दिला आहे. विवोच्या एस ९ शिवाय Vivo S9e स्मार्टफोन सुद्धा लाँच केला जाणार आहे. टीजरवरून हेही उघड झाले आहे की, मध्ये ४४ मेगापिक्सलचा सेल्फी तर Vivo S9e मध्ये ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो. दोन्ही फोन्ससंबंधी अधिक माहिती उघड करण्यात आली नाही. वाचाः Vivo S9 संभावित फीचर्स Vivo S9 मध्ये १२ जीबी रॅम प्लस २५६ जीबी इनबिल्ट स्टोरेज असू शकतो. फोनला ड्यूल सेल्फी कॅमेऱ्यासोबत लाँच केले जाऊ शकते. Vivo S9e मध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक डायमेंसिटी ११०० प्रोसेसर दिला जाऊ शकतो. फोनमध्ये ४४ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सेन्सर असू शकतो. यासोबत ६.४ इंचाचा डिस्प्ले आणि ९० हर्ट्ज रिफ्रेश रेट दिला जाऊ शकतो. हँडसेटमध्ये 4000mAh बॅटरी दिली जाण्याची शक्यत आहे. ३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला जाऊ शकतो. वाचाः Vivo S9e संभावित फीचर्स विवो Vivo S9e मध्ये ६.४४ इंचाचा अमोलेड डिस्प्ले असणार आहे. रिफ्रेश रेट ९० हर्ट्ज असू शकतो. फोनमध्ये ऑक्टा कोर मीडियाटेक डायमेंसिटी ८२० प्रोसेसर दिला जाऊ शकतो. हँडसेटमध्ये ३३ वॉट फ्लॅश चार्जिंग सोबत 4100mAh बॅटरी दिली जाऊ शकतो. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2NXOuI9