नवी दिल्लीः HMD Global ने शुक्रवारी भारतात नवीन Nokia Power Earbuds Lite ची विक्री सुरू करण्यात येत असल्याची माहिती दिली आहे. लाइटची विक्री आता देशभारत सुरू झाली आहे. नोकिया पॉवर ईयरबड्सला ३ हजार ५९९ रुपयांत खरेदी करता येऊ शकते. नोकिया डॉट कॉम आणि अॅमेझॉन डॉट इन वर ईयरबड्स खरेदी साठी उपलब्ध करण्यात आले आहेत. नोकियाच्या या ईयबड्सवर १ वर्षाची वॉरंटी देण्यात येत आहे. वाचाः प्रीमियम डिझाइन नोकिया पॉवर ईयरबड्स लाइट एक प्रीमियम नॉर्डिक डिजाइन मध्ये येते. हे नवीन पॉकेट साइज चार्जिंगमध्ये येते. नोकिया पॉवर ईयरबड्स स्नो आणि चारकोल कलर मध्ये येते. नोकियाच्या म्हणण्यानुसार, नोकिया पॉवर ईयरबड्स लाइटची पॅकेजमध्ये १०० टक्के रिसायकलेबल पेपरचा वापर करण्यात आला आहे. वाचाः ब्लूटूथ सपोर्ट नोकिया पॉवर ईयरबड्स लाइटमध्ये ब्लूटूथ सपोर्ट करतो. यात जबरदस्त साउंड एक्सपिरियन्स आणि क्लियर ऑडियो सोबत येते. सोपे कंट्रोल हे कानाला फिट बसते. या ईयरबड्सला कंट्रोल करणे सुद्धा सोपे आहे. ३५ तास प्लेटाइम नोकियाचा दावा आहे की, एकदा चार्ज केल्यानंतर हे ईयरबड्स ३५ तास पर्यंत प्लेटाइम ऑफर करते. नोकिया पॉवर ईयरबड्स लाइट IPX7 रेटिंग सोबत येते. म्हणजेच एक मीटर पाण्यात ३० मिनिट राहूनही याला नुकसान होत नाही. वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3pVfGEH