Full Width(True/False)

कोट्यवधीच्या फसवणूक प्रकरणी अमिषा पटेलच्या अडचणी वाढल्या

मुंबई: अभिनेत्री हिच्या अडचणी वाढताना दिसून येत आहेत. निर्मात्याची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणात रांची कोर्टानं येत्या दोन आठवड्यात बाजू मांडण्याचा आदेश आमिषाला दिला आहे. अमिषा पटेलवर चित्रपट निर्माते यांचा अडीच कोटींचा चेक बाउंस केल्याचा आरोप आहे. २०१८ साली 'देसी मॅजिक' हा चित्रपट बनवण्यासाठी अजय कुमार यांनी अमिषाला तीन कोटी रुपये उसणे म्हणून दिले होते. त्यानंतर अमिषाकडे ज्या-ज्या वेळी या पैशांची मागणी केली त्या-त्या वेळी तिनं पैसे देण्याऐवजी काहीतरी कारण सांगून वेळ मारून नेली, असा आरोप अजय कुमार यांनी केला आहे. 'देसी मॅजिक' हा चित्रपट पूर्ण होऊ न शकल्याने निर्मात्याने अमिषाकडे पैशांची मागणी केली. अमिषाने मोठ्या मुश्किलीने अडीच कोटींचा चेक दिला. परंतु, ज्यावेळी हा चेक बँकेत जमा केला तर तो बाउंस झाला. या चेक बाउंस प्रकरणी अमिषा विरुद्ध रांची कोर्टात पैशांची फसवणूक केल्याचा खटला सुरू आहे. फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर आतापर्यंत अमिषा हिला अनेक वेळा संपर्क करण्याचा प्रयत्न केला. परंतु, तिनं एकदाही याला उत्तर दिले नाही. त्यानंतर कोर्टाने तिला अनेक वेळा समन्स पाठवले. पैशांवरून कोर्टात अनेकदा कारवाई करण्यात आली. ३ कोटींची फसवणूक केल्याचा आरोप असलेली अमिषा पटेल ही अभिनेता हृतिक रोशन पहिला चित्रपट 'कहो ना प्यार है'..या चित्रपटाच्या यशानंतर चर्चेत आली होती. ती त्या काळी सर्वात नावाजलेली असलेली अभिनेत्री होती. प्रसिद्ध लोकांचे फोटो दाखवून अमिषा पटेल हिने धमकी दिल्याचा आरोपही अजय कुमार यांनी केला आहे. अमिषा पटेल विरोधात या आधीही फसवणूक केल्याचे आरोप झाले आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3875jrx