Full Width(True/False)

Vivo X60, X60 Pro चे ग्लोबल लाँचिंग लवकरच, गुगल प्ले कन्सोलवर लिस्ट

नवी दिल्लीः विवोची Vivo X60 स्मार्टफोन सीरीजला लवकरच ग्लोबल मार्केटमध्ये लाँच केले जाण्याची शक्यता आहे. विवोने डिसेंबर आणि जानेवारी मध्ये में Vivo X60, Vivo X60 Pro आणि Vivo X60 Pro+ स्मार्टफोन्स लाँच केले होते. आता विवो एक्स ६० आणि विवो एक्स ६० प्रोला गुगल प्ले कन्सोल लिस्टिंगवर पाहिले गेले आहे. याचे वैशिष्ट्ये चीनमध्ये लाँच झालेल्या व्हेरियंट्सपेक्षा वेगळे आहे. वाचाः गुगल प्ले कन्सोल लिस्टिंगला एमएसपीने सर्वात आधी सार्वजनिक केले आहे. विवो एक्स ६० मध्ये १२ जीबी रॅम असू शकतो. लिस्टिंगच्या माहितीनुसार, फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८७० प्रोसेसर होणार आहे. स्मार्टफोन अँड्रॉयड ११ वर काम करतो. विवो एक्स ६० मध्ये 1080x2376 पिक्सल रेजॉलूशन ची स्क्रीन दिली जाणार आहे. चीनमध्ये लाँच झालेल्या विवो एक्स ६० सारखेच आहेत. वाचाः चीनमध्ये विवो एक्स ६० ला एक्सीनॉस १०८० आणि १२ जीबी रॅम सोबत लाँच करण्यात आले होते. स्मार्टफोनमध्ये ६.५६ इंचाचा अमोलेड डिस्प्ले आहे. याचा रिफ्रेश रेट १२० हर्ट्ज आहे. फोन अँड्रॉयड ११ बेस्ड ओरिजनल ओएस वर काम करतो. विवो एक्स ६० प्रो मध्ये हे सर्व वैशिष्ट्ये आहेत परंतु, कॅमेरा थोडा चांगला आहे. हँडसेटमध्ये क्वॉड कॅमेरा सेटअप दिला आहे. फोनमध्ये रियरवर ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, १३ मेगापिक्सलचे दोन सेन्सर आणि ८ मेगापिक्सलचे क्वॉड रियर कॅमेरा सेटअप आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. वाचाः विवो एक्स ६० मध्ये ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी आणि १३ मेगापिक्सलचे दोन सेन्सरचा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. हँडसेटमध्ये ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. एक्स ६० फोनमध्ये पॉवर साठी 4300mAh तर एक्स ६० प्रो मध्ये 4200mAh बॅटरी दिली आहे. चिपसेट शिवाय विवो एक्स ६० आणि एक्स ६० प्रोच्या ग्लोबल व्हेरियंट्स मध्ये ओरिजनल व्हर्जन व्हर्जन दिले जाणार आहे. विवोने आता लाँच डेटची घोषणा केली नाही. परंतु, एक्स ६० सीरीजला मार्चच्या अखेरपर्यंत लाँच केले जाण्याची शक्यता आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3suwdkE