नवी दिल्लीः रिलायन्स जिओने पुन्हा एकदा आपला फीचर फोन ग्राहकांसाठी नवीन ऑफरची घोषणा केली आहे. रिलायन्स जिओने आता आणली आहे. कंपनीने एक रिलीज पाठवून ही माहिती दिली आहे. द न्यू जिओ फोन २०२१ ऑफरचा फायदा १ मार्चपासून घेता येऊ शकणार आहे. ही ऑफर देशातील रिलायन्स रिटेल आणि जिओ रिटेलर्सकडे उपलब्ध आहे. जिओ फोन कंपनीने २ जी मुक्त भारत मोहीम अधिक वेगाने सुरू केली आहे. देशात १० कोटीहून जास्त लोक जिओ फोनचा वापर करतात. त्यामुळे जिओफोनचा फायदा कोट्यवधी लोकांना होणार आहे. वाचाः THE NEW OFFER १. नवीन युजर्स १९९९ रुपये किंमत दिल्यानंतर जिओ फोन डिव्हाइस सोबत २४ महिने म्हणजेच २ वर्षापर्यंत अनलिमिटेड सर्विसचा फायदा घेऊ शकणार आहेत. या ऑफर अंतर्गत ग्राहक अनलिमिटेड व्हाइस कॉल , अनलिमिटेड डेटा (दर महिन्याला हाय स्पीड डेटा) चा वापर करू शकतील. कंपनीच्या म्हणण्यानुसार, या ऑफर सोबत ग्राहकांना २ वर्षापर्यंत रिचार्ज करण्याची गरज नाही. वाचाः २. याशिवाय, १४९९ रुपयांचा खर्च केल्यास तुम्हाला जिओफोन डिव्हाइस आणि १२ महिन्यासाठी अनलिमिटेड सर्विस मिळणार आहे. १४९९ रुपयांत युजर्स अनलिमिटेड कॉल, अनलिमिटेड डेटा (२ जीबी हाय स्पीड दर महिन्याला) चा फायदा मिळणार आहे. म्हणजेच वर्षभर १ वर्षापर्यंत रिचार्ज करण्याची गरज नाही. जिओने नवीन जिओ फोन युजर्स शिवाय जुन्या जिओ फोन युजर्ससाठी नवीन ऑफर आणली आहे. वाचाः या ऑफरची किंमत ७४९ रुपये आहे. जर तुम्ही जिओ फोन युजर्स असाल तर ७४९ रुपयांत १ वर्ष म्हणजेच १२ महिन्यापर्यंत अनलिमिटेड सर्विसचा फायदा घेऊ शकतात. या ऑफर अंतर्गत ग्राहकांना अनलिमिटेड व्हॉईस कॉल, अनलिमिटेड डेटा (२ जी हाय स्पीड डेटा दर महिन्याला) मिळू शकणार आहे. म्हणजेच एक वर्षापर्यंत रिचार्ज करण्याची गरज नाही. ही ऑफर १ मार्च पासून सुरू करण्यात येणार आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Mt7VYT