Full Width(True/False)

'तू मुलगी आहेस का?' म्हणणाऱ्यांना इरफानच्या मुलाचं सडेतोड उत्तर

मुंबई: दिवंगत अभिनेता इरफान खानचा मुलगा बाबिल सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. अनेकदा तो त्याच्या वडिलांचे थ्रोबॅक फोटो आणि व्हिडीओंसोबत भावुक पोस्ट शेअर करताना दिसतो. काही दिवसांपूर्वीच बाबिलनं एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. ज्यात त्याच्या चेहऱ्यावर फेसमास्क लावलेला दिसत होता. बाबिलचा हा फोटो पाहून अनेकांनी त्याला मुलगी म्हटलं होतं. आता बाबिलनं एक व्हिडीओ शेअर करत यावर उत्तर दिलं आहे. बाबिल खाननं त्याच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्यानं लिहिलं, 'मी बाहेर जाण्याआधी मेकअप करतो किंवा फेस मास्क लावतो पण त्यावरून काही लोकांनी मला विचारलं तू मुलगी आहेस का? पण मला वाटतं प्रत्येक व्यक्ती हे स्त्री आणि पुरुष यांचं मिश्रण असतं. पण खरा पुरुष तोच आहे जो स्वतःमधल्या स्त्रीला ओळखतो.' बाबिलनं पुढे लिहिलं, मला माझ्या त्वचेची काळजी घेण आवडतं, 'मला सेक्सी दिसणं आवडतं. मी महिलांचा आदर करतो आणि एक पुरुष असल्याचा मला अभिमान सुद्धा आहे. परंतू तुम्ही खऱ्या अर्थाने पुरुष तेव्हा होता जेव्हा तुम्ही तुमचा खोटा पुरुषी अहंकार सोडून महिलांचा आदर करता.' बाबिलनं व्हॅलेंटाइन डेच्या निमित्तानं इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता. ज्यात त्यानं त्याच्या चेहऱ्यावर फेसमास्क लावला होता. ज्यावरून काही लोकांनी त्याला तू मुलगी आहेस का असं म्हणत त्याची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला. त्यावर बाबिलनं त्याच्या या पोस्टमधून सर्वांना सडेतोड उत्तर दिलं. त्याच्या पोस्टवर आता अनेकांच्या कमेंट पाहायला मिळत आहेत. ज्यात सर्वांनी त्याच्या विचारांचं कौतुक केलं आहे. बाबिल सध्या लंडनमध्ये चित्रपट आणि अभिनयाचं शिक्षण घेत आहे. लवकरच तो बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. पण बॉलिवूडमध्ये अद्याप पदार्पण केलेलं नसतानाही बाबिलचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. मागच्या वर्षी २९ एप्रिलला इरफान खानच्या निधनानंतर बाबिलच्या सोशल मीडिया पोस्ट चर्चेत आल्या होत्या. एवढ्या कमी वयात प्रगल्भ विचार करणारा बाबिल सोशल मीडियावर नेहमीच कौतुकाचा विषय ठरतो.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3r2nRAp