Full Width(True/False)

5000mAh बॅटरी आणि 64MP कॅमेऱ्याचा सॅमसंगचा नवा फोन भारतात लाँच

नवी दिल्लीः : दक्षिण कोरियाची स्मार्टफोन निर्माता कंपनी सॅमसंगने भारतात आपला नवीन स्मार्टफोन गुपचूपपणे लाँच केला आहे. या फोनला ५ मार्च रोजी लाँच करण्यात येणार होते. परंतु, 4G ला कंपनीच्या अधिकृत भारतीय वेबसाइटवर लिस्ट करण्यात आले आहे. वाचाः या लाँचिंग सोबतच फोनची किंमत आणि फीचर्सची माहिती दिली आहे. या फोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेट, 5000 एमएएच बॅटरी आणि ६४ मेगापिक्सलचा सेन्सर दिला आहे. या फोनला सर्वात आधी रशियात लाँच करण्यात आले होते. या फोनचे ५जी व्हेरियंट जानेवारी २०२१ मध्ये युरोपियन मार्केटमध्ये लाँच करण्यात आले होते. वाचाः Samsung Galaxy A32 4G ची किंमत या फोनमध्ये ६.४ इंचाच्या इनफिनिटी यू फुल एचडी प्लस एसअमोलेड डिस्प्ले दिला आहे.याचे पिक्सल रेजोल्यूशन 1080 x 2400 आहे. याचे रिफ्रेश रेट ९० हर्ट्ज आहे. हा फोन वॉटरड्रॉप नॉच सोबत येतो. हा पोन २ गीगाहर्ट्ज च्या ऑक्टा कोर प्रोसेसर सोबत येतो. यात ६ जीबी रॅम देण्यात आले आहे. सोबत १२८ जीबी स्टोरेज दिले आहे. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने १ टीबीपर्यंत ते वाढवता येऊ शकते. वाचाः भारतात कोणत्या प्रोसेसर सोबत या फोनला लाँच करण्यात आले आहे. याची माहिती समोर आली नाही. तर रशिया मध्ये या फोनला मीडियाटेक हीलियो जी ८० प्रोसेसर सोबत लाँच करण्यात आले होते. हा फोन ड्यूल सिम कार्ड आणि ३.५ एमएम जॅक सपोर्ट दिला आहे. हा फोन कोणत्या अँड्रॉयड वर काम करतो, हे अद्याप उघड झाले नाही. वाचाः फोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा दिला आहे. याचा प्रायमरी सेन्सर ६४ मेगापिक्सलचा आहे. ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल आहे. ५ मेगापिक्सलचा मायक्रो सेन्सरचा तिसरा तर २ मेगापिक्सलचा चौथा डेप्थ सेन्सर आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये २० मेगापिक्सलचा सेन्सर दिला आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Odd0Fk