Full Width(True/False)

नवीन Samsung Galaxy M12 #MonsterReloaded साठी जेव्हा 12 सेलिब्रिटी एकत्र येतात...

या वर्षातील तिसऱ्या महिन्यात प्रवेश करताच नवनवीन फोन लाँचिंगची रेलचेल पाहायला मिळत आहे. २०२० या वर्षात अनेक फोन परवडणाऱ्या किंमतीत उपलब्ध झाल्याने ते वर्ष स्मार्टफोनसाठी चांगलं राहिलं. दरम्यान, २०२० या वर्षात खरी ताकद Samsung ने दाखवली आणि दमदार फोन लाँच केले. भारतातील आघाडीची कंपनी असलेल्या Samsung ने ग्राहकांची खरी गरज ओळखली आणि त्यानुसार उत्पादने आणली. आता पुन्हा एकदा Samsung ने नवीन #MonsterReloaded च्या निमित्ताने उत्सुकता वाढवली आहे. M सीरिजला नव्या उंचीवर घेऊन जाणाऱ्या Samsung Galaxy M12 #MonsterReloaded ची मार्केटमध्ये अगोदरच चर्चा होती. Samsung ने लाँचिंग निश्चित करताच उत्सुकताही ताणली आहे. 6000mAh बॅटरी आणि 8nm प्रोसेसर असलेल्या Samsung Galaxy M12 ची बॅटरी क्षमता लक्ष वेधून घेणार आहे. या लाँचिंगची उत्सुकता वाढण्यामागचं कारणही तसंच आहे. #MonsterReloaded Samsung Galaxy M12 ची 6000mAh बॅटरी संपवण्यासाठी Samsung ने १२ सेलिब्रिटींना आव्हान दिलं आहे. या सेलिब्रिटींना काय आव्हान स्वीकारलंय ते आपल्याला माहित नाही, पण Samsung चा आत्मविश्वास पाहता एक गोष्ट निश्चित आहे की हे आव्हान खडतर असणार आहे. Samsung Galaxy M12 ची चुणूक दाखवण्यासाठी हे आव्हान आता सज्ज झालं आहे. पण कसं? या सर्व १२ सेलिब्रिटींना या फोनची 6000mAh बॅटरी एका ठराविक क्षमतेपर्यंत संपल्यानंतर एकमेकांकडे पास करायची आहे. हे आव्हान स्वीकारणाऱ्या सर्व सेलिब्रिटींना बॅटरी एका ठराविक क्षमतेपर्यंत संपवून दाखवायची आहे. Samsung Galaxy M12 ला आपली क्षमता माहित असल्यामुळे 6000mAh बॅटरी संपवण्यासाठी मेहनत करावी लागणार हे मात्र नक्की आहे. हा मुकाबला पाहण्यासाठी तुम्हीही आत्ताच सज्ज व्हा! विविध सेलिब्रिटींना दिलेलं आव्हान Samsung च्या #MonsterReloaded ची उत्सुकता आणखी वाढवतं. Samsung Galaxy M12 ची बॅटरी पाहण्यासाठी सिनेसृष्टीतल्या दिग्गजांनी हजेरी लावली तरीही चकीत होऊ नका. यामध्ये सारा जेन, अंगद बेदी, सयानी गुप्ता टीव्ही स्टार वरुन सूद, श्रीया पिळगावकर, अमायरा दस्तूर, सुमीत व्यास, बिग बॉस रनर अप असिम रियाझ, सयान बक्षी, अभिनेता अहाना कामरा, ईशा रेब्बा आणि तुमचा आवडता अभिनेता अमित साध, जो मागच्या Monster चॅलेंजमध्येही होता, यांचा सहभाग असणार आहे. 6000 mAh बॅटरी Samsung Galaxy M12 मधील सर्वात मोठं स्पेसिफिकेशन असेल, पण यात Samsung ने अजूनही दमदार फीचर्स आणले आहेत. Samsung ने M सीरिज लाँच केली तेव्हा सुरुवातीला फोनकडून काय अपेक्षा असतात ते स्पष्ट झालं. मिड रेंजमध्ये Samsung Galaxy M12 चा 48 MP क्वाड कॅमेरा असणार आहे. पण आता A True 48MP कॅमेरा म्हणजे काय याची चर्चा सुरू आहे. नियमित रिझोल्युशनच्या तुलनेत True रिझोल्युशन हे उच्च दर्जाचं आहे. त्यामुळे Galaxy M12 च्या 48 MP कॅमेरामध्ये फोटोग्राफीचा सुंदर अनुभव मिळेल. Samsung ISOCELL GM2 मुळे हे शक्य होणार आहे, ज्यात अल्ट्रा-हाय 48Mp रिझोल्युशन 1/2.25 इमेज सेन्सर आहे, ज्याला Tetrapixel/Remosaic technology चीही साथ मिळेल. Samsung Galaxy M12 च्या कॅमेऱ्याला आणखी ताकद देण्यासाठी 8 MP Ultra-wide कॅमेराही देण्यात आला आहे. यात पोर्ट्रेटसाठी 2 MP डेप्थ लेन्स आणि 2 MP मॅक्रो लेन्स असेल. हा एक 8 MP फ्रंट कॅमेरा आहे. Samsung Galaxy M12 च्या 90Hz रिफ्रेश रेट डिस्प्लेमुळे हा कॅमेरा वेगळा ठरतो. 90Hz मुळे इमेज वेगाने रेंडर होते आणि फोटोचा दर्जाही वाढतो. जर तुम्हाला असं वाटत असेल #MonsterReloaded च्या हाय रिफ्रेश रेटमुळे जास्त बॅटरी लागेल, तर तुमच्या साथीला 6000mAh बॅटरी आहे. ग्राफिक्स परफॉर्मन्ससाठी Samsung Galaxy M12 मध्ये Exynos प्रोसेसर देण्यात आलं आहे. तर मग अजून काय पाहिजे? Samsung ने दिलेल्या या बेस्ट फीचर्ससह Samsung Galaxy M12 सर्व सेलिब्रिटींना टफ फाईट देणार हे निश्चित आहे. पुढचा आठवडाभर ही लढाई पाहायला मिळणार आहे. Samsung ने याबाबतची इतर माहिती शेअर केलेली नाही. त्यामुळे हा सामना उत्सुकता वाढवणारा आणि मनोरंजन करणारा असणार आहे. लवकरच सर्व स्पेसिफिकेशन्स समोर येणं अपेक्षित आहे. तोपर्यंत आणि वर नजर ठेवा, जिथे फोनची विक्री होईल. #MonsterReloaded खरेदी करणं चुकवू नका! डिस्क्लेमर : ही एक ब्रँड पोस्ट असून टाइम्स इंटरनेटच्या स्पॉटलाईट टीमने प्रकाशित केली आहे.


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3rdr0gM