Full Width(True/False)

तापसी पन्नू , अनुराग कश्यपसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरावर आयकर विभागाचा छापा

मुंबई- बॉलिवूडच्या अनेक कलाकार व निर्मात्यांच्या घरावर आयकर विभागाने छापे टाकल्याचं वृत्त आहे. यात बॉलिवूड अभिनेत्री हीचा देखील समावेश आहे. तसेच, चित्रपट निर्माते व विकास बहल यांच्या घरावरदेखील आयकर विभागाने धाड टाकली आहे. त्याचप्रमाणे, मधू मंटेनासहीत इतर अनेक दिग्गज व्यक्तींच्या घरावरदेखील धाड पडल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. वेळेवर प्राप्तीकर न भरणे तसेच प्राप्तीकर चोरीच्या आरोपांमुळे हे पाऊल उचलण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. अनुराग कश्यप, विकास बहल व मधू मंटेना यांच्या घरावरील छापेमारीचं मुख्य कारण त्यांची निर्मिती संस्था आहे. फॅन्टम फिल्म्स या निर्मिती संस्थेत कर चोरीच्या घटना समोर आल्याने आयकर विभागाने हे पाऊल उचलले. हे तिघेही फॅन्टम फिल्म्सचे हिस्सेदार आहेत तर अनुराग या संस्थेचे मालक आहेत. २०१० साली या संस्थेची स्थापना करण्यात आली होती. ही संस्था चित्रपट निर्मिती व वितरणाचे काम करायची. २०१५ साली रिलायन्स इंटरटेन्मेण्टने या संस्थेची ५० टक्के भागीदारी स्वीकारली होती. २०१८ साली कलाकाराचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप विकास यांच्यावर लागला होता. त्यानंतर, त्यांना या संस्थेतून काढून टाकण्यात आलं होतं. त्यानंतर, ही संस्था बंद करण्यात आली. मुंबई आणि पुण्यात मिळून एकूण २२ ठिकाणी आयकर विभागाची ही मोहीम सुरू आहे. तापसीने आजवर अनेक चित्रपटात उत्कृष्ट भूमिका केल्या आहेत. बॉलिवूडमध्ये तिची स्वतःची अशी वेगळी ओळख आहे. परंतु तापसीच्या घरावर छापेमारी का करण्यात आली आहे, याचे कोणतेही कारण समोर आलेलं नाही. तापसी यापूर्वी अनुभव सिंह यांच्या 'थप्पड' या चित्रपटात दिसली होती. तिच्या या चित्रपटाला संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या होत्या. सध्या ती ' लूप लपेटा' या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र असून 'रश्मी रॉकेट' या चित्रपटात देखील दिसणार आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/382IBAs