Full Width(True/False)

6000mAh बॅटरीसोबत २३ मार्चला लाँच होणार Realme C25,फोनचे खास फीचर्स कन्फर्म

नवी दिल्लीः Launch Date: हँडसेट निर्माता कंपनी रियलमी आपला आणखी एक नवीन स्मार्टफोन रियलमी सी २५ ला लाँच करण्याची तयारी करीत आहे. कंपनीने आपल्या या आगामी हँडसेटच्या लाँचिंगची तारीख कन्फर्म केली आहे. रियलमी सी २५ स्मार्टफोनला ग्लोबल मार्केटमध्ये २३ मार्च रोजी लाँच करण्यात येणार आहे. कंपनीने यासाठी एक अधिकृत इव्हेंट पेज बनवले आहे. यावर दोन्ही आगामी स्मार्टफोनची काही प्रमुख वैशिष्ट्ये दिसत आहेत. या फोनला आधी मलेशियात लाँच करण्यात आलेले आहे. वाचाः फोनची खास वैशिष्ट्ये या इव्हेंट पेजवरून माहिती मिळाली आहे की, रियलमी सी २५ स्मार्टफोनमध्ये पॉवर देण्यासाठी 6000mAh बॅटरी देण्यात येणार आहे. तसेच स्पीड आणि मल्टीटास्किंग साठी फोनमध्ये मीडियाटेक हीलियो जी ७० गेमिंग प्रोसेसरचा वापर केला जाणार आहे. कॅमेरा सेटअप म्हणून फोनच्या बॅकवर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाणार आहे. याचा प्रायमरी कॅमेरा सेन्सर ४८ मेगापिक्सलचा असणार आहे. वाचाः वॉटरड्रॉप नॉच सोबत ६.५ इंचाचा डिस्प्ले दिला जाणार आहे. १८ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट सोबत येणार आहे. सिक्योरिटी आणि फिंगरप्रिंट सर्टिफाइड असणार आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या फ्रंट साइडमध्ये ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेन्सर दिला जाणार आहे. Realme C25 च्या फोटोवरून उघड झाले की, सिम ट्रे फोनच्या उजवीकडे असणार आहे. ३.५ मिलीमीटर ऑडियो जॅक आणि स्पीकर ग्रिल फोनच्या खालच्या साईडला असणार आहे. रियलमी सीरीजचे दोन्ही स्मार्टफोन्स २३ मार्चला इंडोनेशियात लाँच केले जाणार आहे. याचे इव्हेंट स्ट्रिमिंग यूट्यूबवर भारतीय वेळेनुसार, दुपारी १२ वाजता सुरु होणार आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3lkFPw1