Full Width(True/False)

6000mAh बॅटरीचा Samsung Galaxy M12 भारतात ११ मार्चला होणार लाँच

नवी दिल्लीः सॅमसंगने भारतात गॅलेक्सी एम १२ च्या लाँचिंगच्या तारखेची घोषणा केली आहे. देशात ११ मार्च रोजी लाँच करण्यात येणार आहे. स्मार्टफोनसाठी अॅमेझॉनवर एक वेगळे पेज बनवण्यात आले आहे. ज्यात हे स्पष्ट झाले आहे. फोनला अॅमेझॉन इंडियावर विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे. लाँचआधी सॅमसंगने गॅलेक्सी एम १२ च्या काही वैशिष्ट्ये उघड केले आहेत. एम सीरीजच्या या फोनमध्ये 6000mAh बॅटरी देण्यात येणार आहे. वाचाः Samsung Galaxy M12 आतापर्यंत समोर आली माहिती सॅमसंगने नवीन फोन गॅलेक्सी एम १२ भारतात ११ मार्चला लाँच करण्यात येणार आहे. दुपारी १२ वाजता होणाऱ्या एका इव्हेंटमध्ये या स्मार्टफोनला आणले जाणार आहे. दक्षिण कोरियाची कंपनी सोबत एक टॅगलाइन Monster Reloadedचा वापर करीत आहे. लाँचआधीच हे उघड झाले आहे की, या फोनमध्ये 6000mAh बॅटरी मिळणार आहे. परंतु, आता हे स्पष्ट करण्यात आले नाही की, बॅटरी फास्ट चार्जिंग सपोर्ट करणार की नाही. वाचाः अॅमेझॉनवर बनवलेल्या मायक्रोसॉफ्ट वरून हे उघड झाले आहे की, या फोनमध्ये ६.५ इंचाचा डिस्प्ले दिला जाणार आहे. हँडसेटमध्ये देण्यात आलेल्या इनफिनिटी व्ही डिस्प्ले फ्रंट कॅमेरासाठी एक वॉटरड्रॉप स्टाइल नॉच दिली आहे. स्क्रीनचे रिफ्रेश रेट ९० हर्ट्ज होणार आहे. गॅलेक्सी एम १२ मध्ये ट्रू ४८ मेगापिक्सलचा क्वॉड कॅम ISOCELL Plus टेक्नोलॉजी दिली जाणार आहे. फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा GM2 सेंसर सोबत 5 मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड, 2 मेगापिक्सल डेप्थ कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा मायक्रो सेन्सर दिला जाण्याची शक्यता आहे. या फोनमध्ये सेल्फीसाठी ८ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला जाण्याची शक्यता आहे. वाचाः गॅलेक्सी एम12 मध्ये 8nm एक्सीनॉस प्रोसेसर दिला जाण्याची शक्यता आहे. कंपनीने प्रोसेसरच्या नावाची माहिती अजून उघड केलेली नाही. यात एक्सीनॉस ८५० प्रोसेसर असू शकतो. या फोनला दोन स्टोरेज मध्ये लाँच केले जाऊ शकतो. गॅलेक्सी एम १२ च्या बेस व्हेरियंटमध्ये ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी इनबिल्ट स्टोरेज मिळू शकतो. याशिवाय, ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज व्हेरियंट लाँच केले जाऊ शकते. या फोनला ब्लॅक, व्हाइट, आणि ब्लू कलर मध्ये लाँच केले जाऊ शकते. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3bSukYx