Full Width(True/False)

'उधार घेतलंस की चोरी केलीस?' राहुल वैद्य होतोय ट्रोल

मुंबई- बिग बॉस रनरअप सध्या त्याच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे. बिग बॉसच्या घरात दिशा परमारला लग्नासाठी प्रपोज केल्यानंतर हे कपल सोशल मीडियावर चर्चेत आलं आहे. नुकताच राहुल त्याची गर्लफ्रेंड दिशा परमारसोबत व्हेकेशनसाठी रवाना झाला आहे. याची माहिती त्यानं स्वतःच सोशल मीडियावरून दिली आहे. राहुलनं त्याच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यात तो आणि दिशा एका हेलीकॉप्टरसमोर उभे असलेले दिसत आहेत. राहुल वैद्यानं त्याच्या इन्स्टाग्रामवर दिशासोबतचा जो फोटो शेअर केला आहे त्याच्या कॅप्शनमध्ये त्यानं लिहिलं, 'चलो ले चलें तुम्हें तारों के शहर में... मुंबईपासून काही दिवस दूर माझ्या क्वीनसोबत' या फोटोमध्ये दिशा आणि राहुल याची जोडी एकदम परफेक्ट दिसत आहे. पण यासोबतच आणखी एका गोष्टीची सोशल मीडियावर चर्चा होत आहे ती म्हणजे राहुल वैद्यचे आउटफिट्स. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोमध्ये राहुलनं जो स्वेटशर्ट घातला आहे. अगदी हुबेहूब त्या स्वेटशर्ट सारखाच स्वेटशर्ट रुबीना दिलैकनं मध्ये घातला होता. यावरून आता राहुलला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. एका युझरनं कपड्यांवरून राहुलची खिल्ली उडवताना लिहिलं, 'ते सर्व ठिक आहे पण तू रुबीना कडून हूडी उधार घेतली आहेस की चोरली आहेस? लवकरच तिला परत कर' याशिवाय इतर अनेक युझर्सनी राहुलला या स्वेटशर्टवरून ट्रोल करत 'कॉपी कॅट' असं म्हटलं आहे. बिग बॉसचा १४ वा सीझन संपल्यानंतर दिलेल्या मुलाखतीत राहुल वैद्यनं दिशा परमारसोबत लग्नाच्या प्लानविषयी सविस्तर सांगितलं. दिशा आणि त्याचं लग्न इतरांपेक्षा खूपच वेगळं आणि खास असणार असल्याचंही राहुलनं यावेळी स्पष्ट केलं एवढंच नाही तर त्यानं पाहुण्यांच्या नावाची यादी तयार करण्यासही सुरुवात केल्याचं सांगितलं. तसेच त्याच्या लग्नात फक्त ५०-६० निवडक लोकांनाच बोलवलं जाणार असल्याचं त्यानं स्पष्ट केलं. ज्यात सलमान खानचं नाव सर्वात आधी असेल. याशिवाय अली गोनी आणि जास्मिन भसीन यांनाही आपल्या लग्नाचं आमंत्रण असेल असं राहुलनं एका मुलाखतीत सांगितलं आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3sBrA8C