मुंबई: आणि सैफ अली खान काही दिवसांपूर्वीच दुसऱ्यांदा आई-बाबा झालेत. करिनाच्या बाळाची पहिली झलक अद्याप चाहत्यांना पाहायला मिळालेली नाही. करोनाच्या संक्रमणामुळे करिना-सैफ बाळाच्या सुरक्षेसाठी योग्य ती सर्व काळजी घेताना दिसत आहे. अशात काही जवळचे मित्र आणि नातेवाईक करिनाच्या घरी बाळाला पाहण्यासाठी जात असल्याचं पाहायला मिळालं आहे. करिनाचा भाऊ आणि जवळची मैत्रीण सुद्धा रविवारी संध्याकाळी बाळाला पाहण्यासाठी करिनाच्या घरी पोहोचले मात्र यावेळी त्याठिकाणी फोटोग्राफर्सचं वागणं पाहिल्यावर अर्जुनला राग अनावर झाला आणि तो फोटोग्राफर्सवर भडकलेला दिसला. अर्जुन कपूरचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडीओ करिना कपूरच्या अपार्टमेंटच्या बाहेरचा आहे. रविवारी संध्याकाळी करिनाच्या बाळाला पाहण्यासाठी अर्जुन कपूर गर्लफ्रेंड मलायका अरोरासोबत या ठिकाणी पोहोचला होता. त्यावेळी करिनाच्या घराच्या बाहेर उभ्या असलेल्या फोटोग्राफर्सचं वागणं पाहिल्यावर अर्जुन कपूर त्यांच्यावर खूप चिडला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये सुरुवातीला अर्जुन कपूर त्याच्या कारमधून बाहेर पडताना दिसत आहे. कारमधून उतरल्यावर काही फोटोग्राफर्स त्याठिकाणी बिल्डिंगच्या भिंतीवर चढून फोटो काढण्याचा प्रयत्न करत असलेलं त्याच्या नजरेस पडलं. या फोटोग्राफर्सना सुरुवातीला अर्जुननं असं न करण्याची विनंती केली. तो म्हणाला, 'तुम्ही बिल्डिंगच्या भिंतीवर असं चढू नका. हे चुकीचं आहे मी तुम्हाला विनंती करतो.' अर्जुन समजवून सांगत असतानाही एक फोटोग्राफर भिंतीवर चढण्याचा प्रयत्न करत होता हे पाहिल्यावर मात्र अर्जुनला राग अनावर झाला. त्यानंतर तो गेटजवळ पोहोचला आणि म्हणाला, 'मी विनंती करत आहे पण तुम्ही ऐकायला तयार नाही. अरे भावा... लाल शर्टवाला आता घाबरून का पळत आहेस.' अर्जुन कपूरचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. करिनाच्या बाळाची पहिला झलक क्लिक करता यावी म्हणून अनेक फोटोग्राफर्स बरेच प्रयत्न करत आहेत. पण त्यांचं असं वागणं बिल्डिंगच्या भिंतीवर चढणं चुकीचं आहे आणि कदाचित त्यातून त्यांनाही दुखापत होऊ शकते त्यामुळे अर्जुन त्यांच्यावर रागावल्याचं पाहायला मिळालं. यावेळी त्याच्यासोबत मलायका सुद्धा करिनाच्या घरी पोहोचली. अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा मागच्या २ वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघंही अनेकदा एकत्र फिरताना किंवा व्हेकेशनसाठी जाताना दिसतात. यावर्षी न्यू ईयरच्या वेळीही हे दोघं व्हेकेशनसाठी गोव्याला गेले होते. त्या ठिकाणचे त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरलही झाले होते.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3bPOEtu