नवी दिल्लीः Launch: चीनची स्मार्टफोन कंपनी रियलमीने आपला मार्केट मध्ये एक नवीन हँडसेट लाँच केला आहे. या फोनचे नाव 5G आहे. हा फोन ५जी वर आधारित वेगन लेदर डिझाइन सोबत येतो. २०२१ मधील कंपनीचा हा पहिला फ्लॅगशीप फोन आहे. हा फोन पंचहोल डिस्प्ले आणि ड्यूअल टोन दिला आहे. फोन मध्ये रेक्टांग्यूलर कॅमेरा आणि इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे. या फोनचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात स्नॅपड्रॅगन ८८८ प्रोसेसर, अँड्रॉयड ११, 120Hz अमोलेड डिस्प्ले आणि 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर दिला आहे. या फोनमध्ये व्हीसी कुलिंग सिस्टम सुद्धा दिली आहे. जाणून घ्या डिटेल्स. वाचाः Realme GT 5G ला दोन व्हेरियंट मध्ये लाँच करण्यात आले आहे. याच्या ८ जीबी रॅम स्टोरेज आणि २८ जीबी स्टोरेज सोबत येतो. याची किंमत २७९९ चिनी युआन म्हणजेच जवळपास ३४ हजार रुपये आहे. तर याच्या १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेजच्या व्हेरियंटची किंमत ३२९९ चिनी युआन म्हणजेच ३७ हजार रुपये आहे. हा फोन वेगन लेदर एडिशन अंतर्गत लाँच केला आहे. हे एडिशन १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज व्हेरियंटसोबत याची किंमत ३३९९ चिनी युआन म्हणजेच ३८ हजार रुपये आहे. हे एडिशन रेसिंग येलो कलर मध्ये येतो. फोनला ब्लू आणि सिल्वर कलर मध्ये खरेदी केले जाऊ शकते. वाचाः फोनची सेल चीनमध्ये १० मार्च पासून सुरू होणार आहे. या फोनला भारतीय मार्केटमध्ये कधीपर्यंत लाँच केला जाणार आहे, याची माहिती अद्याप समोर आली नाही. मार्केटमध्ये या फोनची टक्कर Xiaomi Mi 11 आणि Samsung Galaxy S21 याच्याशी होणार आहे. या फोनला ६.४३ इंचाचा एफएचडी प्लस अमोलेड डिस्प्ले दिला आहे. हा फोन पंच होल कटआउट सोबत येतो. याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. याचा 360Hz टच सँपलिंग रेट दिला आहे. यात 1000nits पीक ब्राइटनेस दिली आहे. फोनवर कॉर्निंग गोरिला ग्लास ५ चे प्रोटेक्शन दिले आहे. हा फोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८८८ ५जी प्रोसेसर दिला आहे. वाचाः फोनमध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे. सोबत डॉल्बी एटमस आणि हाय रेस ऑडियो सारखे फीचर्स उपलब्ध करण्यात आले आहे. फोनमध्ये व्हीसी कूलिंग सिस्टम दिले आहे. या फोनमध्ये फोटोग्राफीसाठी ६४ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. याचा सेकंडरी कॅमेरा सेन्सर ८ मेगापिक्सलचा, तिसरा कॅमेरा २ मेगापिक्सलचा सेन्सर आहे. फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये पॉवर देण्यासाठी 4500 एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. ६५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3bXaXgY