Full Width(True/False)

आता तर हद्दच झाली! मराठी मालिकेतील 'ते' दृश्य पाहून प्रेक्षकांना संताप अनावर

मुंबई:मालिकांचे प्रमोशन किंवा मालिकेची उत्सुकता निर्माण करण्यासाठी नवीन फंडे काढले जातात. त्यासाठी मालिकांमध्ये काही दृश्य अतिरंजित केली जातात. त्यामुळं एखाद्या व्यक्तीची प्रतिमा मलीन करण्यापासून ते लोकांच्या भावना भडकवण्यापर्यंतचे मुद्दे आता समोर येत आहेत. असं असतानाच अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या '' मालिकेतील एका दृश्यावर प्रेक्षकांना नाराजी व्यक्त केली आहे. लठ्ठपणा , गरिब घरातील मुलगी, श्रीमंत गरातील मुलगा, अशी या मालिकेची कथा दाखवण्यात आली आहे. स्वीटू, ओमकार, निलू, शकू , रॉकी ही पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस पडत असली तरी, मालिकेतील खलनायिका असेलली मालकिवा मात्र पेक्षकांना आवडत नाहीए, तिचं हे पात्र काल्पनीक असलंतरी, तिची भूमिका चुकीच्या पद्धतीनं दाखवण्यात येत असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. तसंच नुकत्याच प्रक्षेपीत झालेल्या एका भागात मालविकाचं वागणं हे अत्यंत खालत्या पातळीचं असं होतं, अशा प्रतिक्रिया प्रेक्षकांकडून येत आहे. काय आहे हे वादग्रस्त दृश्य?खानविलकर यांच्या घरातील मालविका त्यांच्या उद्योग सांभाळत असते. श्रीमंतचीचा गर्व असलेल्या मालविकाला गरिब घरातील व्यक्तींबद्दल चीड येते, असं दाखण्यात येतं. परंतु तिनं रॉकीला पशूसारखी वागणूक दिल्याचं दाखवण्यात आलं आहे. मालविकाचा राग दाखवण्यासाठी ती रॉकीच्या गळ्यात कुत्र्याचा पट्टा घालून त्याला शिक्षा देते. असं दृश्य दाखवण्यात आलं आहे. मुळात कुठल्याही मालिकेच मुख्य कामच हे असतं की प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण करणं. त्यासाठी वेळप्रसंगी अतिरंजितपणाचाही आधार घेतला जातो. अशा अनेक मालिका चर्चेत राहतात. पण, टीव्ही माध्यम सहकुटुंब पाहिलं जात असल्यानं त्याचं भान राखलं जायला हवं, असा सूर उमटताना दिसतोय.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3e72BFY