नवी दिल्लीः हँडसेट निर्माता कंपनी Realme आपली नवीन ला लाँच करण्याची तयारी करीत आहे. रियलमी इंडियाचे सीईओ माधव सेठ यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करून एक फोटो पोस्ट केला आहे. ज्यात रियलमी ८ प्रो स्मार्टफोनच्या बॅक पॅनेल सोबत एक रियलमी ८ रिटेल बॉक्सचे रियर दिसत आहे. ज्यावर फोनमध्ये देण्यात आलेले खास फीचर्स दिसत आहेत. वाचाः Realme 8 आणि दोन्ही कंपनीचे आगामी स्मार्टफोन्स आहेत. सध्या कंपनीने रियलमी ८ सीरीजच्या लाँचिंगच्या तारखेवरून पडदा हटवला नाही. परंतु, कंपनीने आपल्या लेटेस्ट रियलमी ८ सीरीजच्या स्मार्टफोन्सला टीज करणे सुरू केले आहे. यावरून हे संकेत मिळत आहेत की, लेटेस्ट स्मार्टफोन्स भारतात ग्राहकांसाठी लाँच केले जातील. वाचाः Realme 8 चे फीचर्स रियलमी इंडियाचे सीईओ माधव सेठ यांनी शेअर केलेल्या रियलमी ८ च्या रिटेल बॉक्सच्या मागच्या भागात खास माहिती दिली आहे की, फोनमध्ये ६.४ इंचाचा सुपर अमोलेड डिस्प्ले आहे. तसेच यात स्पीड आणि मल्टिटास्किंगसाठी मीडियाटेक हीलियो जी ९५ प्रोसेसर दिला आहे. कॅमेरा सेटअप मध्ये फोनच्या मागे चार रियर कॅमेरे दिले आहेत. याचा प्रायमरी कॅमेरा सेन्सर ६४ मेगापिक्सलचा आहे. याशिवाय, फोनमध्ये पॉवर देण्यासाठी यात ५००० एमएएच क्षमतेची पॉवर देण्यात आली आहे. ३० वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट देते. वाचाः Realme 8 Pro कंपनीचा या सीरीजचा सुपिरीयर मॉडल असू शकतो. फोटोत १०८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सेन्सर दिला आहे. याशिवाय, कन्फर्म करण्यात आले आहे की, Samsung HM2 कॅमेरा सेंसर, स्टारी टाइम-लॅप्स व्हिडिओ आणि तीन वेगवेगळे पोर्ट्रेट मोड्स सोबत येते. यात काही फीचर्स रियलमी ८ मॉडल मध्ये पाहायला मिळू शकतात. माधव सेठ कडून देण्यात आलेला फोटोत रियलमी ८ प्रोचे बॅक पॅनेल दिसते. ज्यावर Dare To Leap टॅगलाइन लिहिली आहे. रियर पॅनेलवरून स्पष्ट दिसते की, क्वॉड कॅमेरा सेटअप आहे. फोटोत दिसतेय की, फोनमध्ये १०८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर दिला आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3bcl9mk