Full Width(True/False)

श्रद्धाचं बॉयफ्रेंड रोहनसोबत बर्थडे सेलिब्रेशन, व्हिडीओची चर्चा

मुंबई: अभिनेत्री सध्या मालदीवमध्ये प्रियांक शर्मा आणि शजा मोरनी यांच्या लग्नाच्या सेलिब्रेशनमध्ये बिझी आहे. पण या दरम्यान तिनं ३ मार्चला याच ठिकाणी तिचं बर्थ डे सेलिब्रेशन सुद्धा केलं. या सेलिब्रेशनचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. असाच एका व्हायरल व्हिडीओमध्ये श्रद्धा तिचा कथित बॉयफ्रेंड रोहन श्रेष्ठासोबत दिसत आहे. श्रद्धा आणि रोहनचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर भलताच चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये श्रद्धा कपूर तिच्या फॅमिली सोबत बर्थ डे सेलिब्रेशन आणि केक कट करताना दिसत आहे. यावेळी श्रद्धाचा भाऊ माईकवर मोठ-मोठ्यानं तिला चिअर अप करत आहेत. तर त्याचवेळी रोहननं श्रद्धाला पाठीमागून मिठी मारलेली दिसत आहे. काही क्षणात तो मिठी सोडतो आणि मग श्रद्धा केक कट करते. पण एवढे दिवस श्रद्धा आणि रोहननं जे नातं लपवण्याचा प्रयत्न केला होता. ते आता सर्वांसमोर उघड झालं आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ खूप व्हायरल होताना दिसत आहे. मागच्या काही काळापासून श्रद्धा कपूर आणि यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू आहेत. मात्र या दोघांनी यावर कोणतही भाष्य न करता हे नातं लपवण्याचा नेहमीच प्रयत्न केला. मात्र रोहनची श्रद्धाच्या कौटुंबीक कार्यक्रमातील उपस्थिती मात्र बरच काही सांगून जाते. त्यामुळे हे दोघं लग्न कधी करणारी ही चर्चा बरेचदा होताना दिसते मात्र श्रद्धानं सध्या मी माझ्या करिअरवर फोकस करत असल्याचं सांगत हा प्रश्न नेहमीच टाळला आहे. रोहन श्रेष्ठा हा एक प्रसिद्ध फोटोग्राफर असून तो श्रद्धाचा फॅमिली फ्रेंड सुद्धा आहे. दरम्यान श्रद्धा कपूरच्या बर्थ डे सेलिब्रेशनचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये श्रद्धा तिच्या 'स्त्री' चित्रपटातील 'कमरिया' या गाण्यावर धम्माल डान्स करताना दिसली होती. सेलिब्रेटी फोटोग्राफर विरल भयानी यांनी त्यांच्या इन्स्टाग्रावर श्रद्धाचा हा व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये श्रद्धासोबत तिचा भाऊ सिद्धांत कपूर सुद्धा आहे. श्रद्धाची मावशी पद्मिनी कोल्हापुरे यांचा मुलगा प्रियांक आणि चित्रपट निर्माता करीम मोरानी यांची मुलगी शजा यांच्या लग्नासाठी ती सध्या मालदीवमध्ये आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2Ptfgc5