Full Width(True/False)

सुशांतच्या स्मरणार्थ मेलबर्नमधील चाहत्यांनी केली 'ही' खास गोष्ट

मुंबई : अभिनेता याच्या निधनाचा धक्क्यामधून अजूनही त्याचे कुटुंबिय,मित्रमंडळी आणि त्याचे चाहते बाहेर आलेले नाहीत. दरम्यान ६७ व्या राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाले असून सुशांतच्या शेवटचा सिनेमा असलेल्या 'छिछोरे'ला सर्वोत्कृष्ट सिनेमाचे पारितोषिक मिळाले आहे. याबद्दल त्याचे चाहते आनंद व्यक्त करत आहे, तर दुसरीकडे सुशांतची बहिण श्वेता सिंह कीर्ती ही त्याच्या आठवणीमध्ये ती भावूक झाली. श्वेता ने सोशल मीडियावर आपल्या भावासंदर्भात एक पोस्ट लिहिली आहे. श्वेताने ' छिछोरे' सिनेमाला पारितोषिक मिळाल्याचा आनंद व्यक्त करत ती म्हणते, ' भाई, मला माहिती आहे हे सगळे तू पाहतो आहेस. हे पारितोषिक घेण्यासाठी तू हवा होतास. तू गेल्यांतर एकही दिवस असा गेला नाही की त्या दिवशी तुझा आम्हांला गर्व वाटलेला नाही.' दरम्यान, ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथील सुशांतच्या चाहत्यांनी एका बागेमध्ये सुशांतच्या स्मरणार्थ एक बेंच ठेवला आहे. त्याला 'सुशांत पॉईंट' असे नाव दिले आहे. या बेंचचा फोटो श्वेताने पोस्ट केला आहे. हा फोटो पोस्ट करताना श्वेता म्हणते, ' तो अजूनही जिवंत आहे...त्याचे नाव जिवंत आहे...त्याच्या जीवनाचे सार जिवंत आहे...एका पवित्र आत्माच्या हा परिणाम आहे. तू कायम जिवंत राहणार आहेस. ' सुशांतसिंह राजपूत याचा मृतदेह १४ जून २०२० मध्ये त्याच्या घरीच सापडला होता. मुंबई पोलिसांनी त्याच्या मृत्यूचा तपास केला असता त्याने आत्महत्या केल्याचे समोर आले. त्यानंतर ही केस सीबीआयकडे सोपावण्यात आली. सीबीआयचा तपास सुरू असून अद्याप कोणताही निष्कर्ष त्यांनी काढलेला नाही. दरम्यान, या केसचा तपास सुरू असताना ड्रग्जप्रकरण पुढे आले आणि त्याप्रकरणी एनसीबीने रिया चक्रवर्तीसह ३३ जणांना आरोपी ठरवले आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3d0tRUt