Full Width(True/False)

'मर्डर' पाहून भडकली होती इम्रान हाश्मीची पत्नी, प्रत्येक किसिंग सीननंतर द्यावं लागतं 'हे' गिफ्ट

मुंबई- आपल्या नवऱ्याने दुसऱ्या स्त्रीकडे नुसतं पाहिलं तरीही बायकांच्या रागाचा पारा चढतो. त्यात जर आपला पती प्रत्येक चित्रपटात एखाद्या अभिनेत्रीसोबत किसिंग सीन देत असेल तर त्याच्या पत्नीच्या रागाचा आपण विचारही करू शकत नाही. बॉलिवूड अभिनेता याच्यासोबतही असच काहीसं झालं. इम्रान त्याच्या चित्रपटात किसिंग सीन देण्यासाठी प्रसिद्ध आहे. परंतु त्याच्या या गोष्टीचा प्रभाव मात्र त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर होताना दिसतो. त्याचा 'मर्डर' हा अत्यंत गाजलेला चित्रपट पाहून त्याची पत्नी परवीन साहनी प्रचंड रागावली होती. बॉलिवूडचा 'सीरिअल किसर' अशी ओळख असलेला अभिनेता इम्रान प्रत्येक चित्रपटात किसिंग सीन देण्यासाठी प्रसिद्ध आहे. परंतु त्याचा 'मर्डर' हा चित्रपट पाहून त्याची पत्नी खूप रागावली होती. इम्रानने त्याच्या गर्लफ्रेंडसोबत २००३ साली लग्न केलं होतं. या चित्रपटात इम्रानने खूप जास्त इन्टिमेट सीन चित्रित केले होते. ते पाहून त्याच्या पत्नीचा राग इतका अनावर झाला. चित्रपट पाहताना तिने त्याचा हात घट्ट पकडला होता. ते सीन पाहून तिने त्याचा हात इतक्या जोरात आवळला की तिची नखं त्याच्या हातात रुतली होती. त्याच्या हातातून रक्त येऊ लागलं होतं. इम्रानने त्याच्या एका मुलाखतीदरम्यान हा खुलासा केला होता की, परवीन बॉलिवूडच्या झगमगाटापासून दूर राहणं जास्त पसंत करते. सुरुवातीला तिला इम्रानचे हे सीन पाहून खूप राग यायचा. थोड्या दिवसांनी ती समजून गेली की हा त्याच्या कामाचा एक भाग आहे. परंतु, तिने त्याला इतक्या सहजासहजी हे सीन करायची परवानगी दिलेली नाही. त्यासाठी तिला लाखो रुपयांची खरेदी करून द्यावी लागते. इम्रानला प्रत्येक किसिंग सीननंतर तिला एक महागडी हॅण्डबॅग भेट द्यावी लागते. यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की परवीनकडे किती हॅण्डबॅग असतील.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3rmjjEB