Full Width(True/False)

जॉन अब्राहमच्या फोटोचा सोशल मीडियावर धुमाकूळ; कुणी म्हटलं हॉट तर कुणी...

मुंबई: बॉलिवूड अभिनेता यानं त्याच्या आगामी '' या चित्रपटाचं काम सुरू केलं आहे. जॉननं चित्रपटाच्या सेटवरचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमुळं तो सध्या चर्चेत आलाय. जॉननं शेअर केलेल्या न्यूड फोटोमुळं त्याला ट्रोलही करण्यात येत आहे. जॉननं शेअर केलेल्या फोटोमध्ये तो एका सोफ्यावर बसलाय. त्यानं कपडे परिधान केले नसल्याचं दिसून येतय. तसंच मांडीवर एक उशी ठेवली आहे. 'माझे कपडे येण्याची वाट पाहतोय, सेटवर असंच असतं माझं आयुष्य', असं त्यानं या फोटोच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. एकानं लिहिलं आहे तुझे कपडे कुठे आहेत तर, दुसऱ्या एका युजरनं उन्हाळा सुरू झालाय वाटतं..असं म्हणत जॉनची खिल्ली उडवली आहे. दरम्यान, बॉलिवूडचा हा अ‍ॅक्शन स्टार लवकरच '' या चित्रपटातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झालं असून त्यानंतर लगेचच जॉननं ' ' या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. पण या चित्रपटातील एका अ‍ॅक्शन सीनचं शूटिंग करताना त्याला दुखापत झाली आहे. जॉननं स्वतः याबाबतची माहिती इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करून दिली आहे. याआधी जॉनला 'सत्यमेव जयते २' सेटवरही दुखापत झाली होती.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/301Fftl