मुंबई: अभिनेता कार्तिक आर्यनचा आगमी चित्रपट ''चा टीझर नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटात एका पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. राम माधवानी दिग्दर्शित 'धमका' चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. या चित्रपटाचा टीझर कार्तिक आर्यननं त्याच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. कार्तिक आर्यननं त्याच्या इन्स्टाग्रामवर 'धमाका'चा टीझर शेअर केला आहे. या टीझरच्या कॅप्शनमध्ये त्यानं लिहिलं, 'मी अर्जुन पाठक, मी जे सांगेन ते सत्य सांगेन.' या व्हिडीओमध्ये, कार्तिक आर्यन सुटा-बुटात कॅमेरासमोर बसलेला दिसतो आणि तो जोरजोरात ओरडून कॅमेरा बंद करायला सांगतो. या व्हिडीओत कार्तिकच्या चेहऱ्यावरील भाव जबरदस्त आहेत. कार्तिकच्या या चित्रपटाच्या कथेविषयी बोलायचं तर चित्रपटाची कथा मुंबईतली आहे. एक पत्रकारला एका अनोळखी व्यक्तीचा कॉल येतो. जो त्याला वांद्रे-वरळी सी लिंक उडवण्याची धमकी देतो. मागच्या वर्षी १२ डिसेंबरला कार्तिकनं या चित्रपटाचं शूटिंग सुरू केलं होतं. ज्याची माहिती त्यानं त्याच्या सोशल मीडियावरून दिली होती. दरम्यान हा चित्रपट नेमका कोणत्या दिवशी रिलीज होणार याची अधिकृत माहिती मिळालेली नाही. कार्तिक आर्यनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर मागच्या वर्षी सारा अली खानसोबत 'लव्ह आजकल'मध्ये दिसला होता. याशिवाय त्याआधी रिलीज झालेला त्याचा 'पति पत्नी और वो' सुद्धा बॉक्स ऑफीसवर तुफान चालला होता. सध्या कार्तिककडे 'भूल भुलैय्या २' आणि 'दोस्ताना २' असे दोन चित्रपट आहेत.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3q3CzGd