नवी दिल्लीः शाओमीचा लोकप्रिय स्मार्टफोन आहे. बजेट मध्ये खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी ही जबरदस्त संधी आहे. अॅमेझॉन इंडियावर फोनला सूट सोबत उपलब्ध खरेदी करण्याची संधी आहे. या फोनमध्ये रेडमी ९ पॉवर क्वॉड रियर कॅमेरा सेटअप सोबत येते. वाचाः Redmi 9 Power ची किंमत आणि ऑफर्स रेडमी ९ पॉवरच्या ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी इनबिल्ट स्टोरोजच्या फोनची किंमत १० हजार ९९९ रुपये आहे. ४ जीबी रॅम प्लस १२८ जीबी इनबिल्ट स्टोरेज व्हेरियंटची किंमत ११ हजार ९९९ रुपये आहे. तर नवीन ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज व्हेरियंटची किंमत १२ हजार ९९९ रुपयांत खरेदी करू शकता. अॅमेझॉन वरून एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड आणि ईएमआय ट्रांझॅक्शन द्वारे खरेदी केल्यास या फोनवर ७५० रुपयांची सूट मिळणार आहे. वाचाः Redmi 9 Power चे खास वैशिष्ट्ये या फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेऱ्या सोबत क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. रियर कॅमेरा नाइट मोड, एचडीआर आणि प्रो मोड सपोर्ट करतो. फोनमध्ये सेल्फीसाठी ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. हँडसेट ब्लेजिंग ब्लू, इलेक्ट्रिक ग्रीन, फेयरी रेड आणि मायटली ब्लॅक कलर मध्ये मिळतो. वाचाः रेडमीच्या या स्मार्टफोनमध्ये ६.५३ इंचाचा फुल एचडी प्लस स्क्रीन दिले आहे. स्क्रीनची पिक्सल डेनिसिटी ३९४ पीपीआय आणि आस्पेक्ट रेशियो १९.५.९ आहे. फोनमध्ये ४ जीबी रॅम, ६ जीबी रॅम व ६४ जीबी आणि १२८ स्टोरेज जीबी इनबिल्ट स्टोरेज दिला आहे. याला मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने ५१२ जीबी पर्यंत वाढवता येऊ शकते. फोनला ड्यूल सिम सपोर्ट करतो. हा फोन अँड्रॉयड १० ऑपरेटिंग सिस्टम दिला आहे. हँडसेटमध्ये २ गीगाहर्ट्ज क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ६६२ प्रोसेसर उपलब्ध आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 6000mAh बॅटरी दिली आहे. फोनमध्ये कनेक्टिविटीसाठी सर्व सुविधा दिली आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3r9VOzc