Full Width(True/False)

करिना कपूरनं शेअर केली छोट्या नवाबची पहिली झलक, पाहा फोटो

मुंबई: अभिनेत्री २१ फेब्रुवारीला दुसऱ्यांदा आई झाली. तेव्हापासून तिच्या दुसऱ्या मुलाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. बाळाची पहिली झलक पाहण्यासाठी अनेक चाहते उत्सुक होते. तर करिना कपूरनं महिला दिनाच्या निमित्तानं आपल्या दुसऱ्या मुलाचा पहिला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत करिनानं महिला दिनाच्या शुभेच्छा सुद्धा दिल्या आहेत. करिना कपूरनं एक ब्लॅक अँड व्हाइट सेल्फी शेअर केला आहे. ज्यात तिच्या खांद्यावर तिचा मुलगा झोपलेला दिसत आहे. या फोटोसोबत तिनं एक सुंदर मेसेज सुद्धा दिला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं, 'अशी कोणतीच गोष्ट नाही जी स्त्रियांना जमणार नाही. महिला दिनाच्या शुभेच्छा. #internationalwomensday ' करिना कपूरनं पहिला मुलगा तैमुरच्या जन्मानंतर ४ वर्षांनी २१ फेब्रुवारीला दुसऱ्या मुलाला जन्म दिला. सध्या करिना आपलं मातृत्व एन्जॉय करत आहे. गरोदरपणाच्या काळात ती शेवटच्या दिवसांपर्यंत कामात व्यस्त होती. करिनानं शेअर केलेल्या फोटोमध्ये तिच्या बाळाचा चेहरा मात्र दिसत नाही आहे. करिना आणि सैफचं लग्न २०१२ मध्ये झालं होतं. लग्नानंतर ४ वर्षांनी म्हणजेच २०१६ मध्ये तमैरचा जन्म झाला होता. त्यानंतर लॉकडाऊनच्या करिनानं दुसऱ्या प्रेग्नन्सीची बातमी सर्वांशी शेअर केली होती. सोशल मीडियावर एक पोस्ट करत सैफ आणि करिनानं याची माहिती दिली होती. त्यांनी लिहिलं होतं, 'आमच्या घरात नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. सर्व शुभचिंतक आणि शुभेच्छा देणाऱ्यांचे आभार'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2O3AxJj