मुंबई: ८ मार्चला संपूर्ण जगभरात महिला दिन (International Womens Day) साजरा केला जातो. सध्या सर्व क्षेत्रातील महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना दिसतात. मग यात बॉलिवूड अभिनेत्री तरी मागे कशा राहतील. मागच्या काही वर्षांमध्ये बॉलिवूड अभिनेत्रींनी सुद्धा अभिनेत्याशिवायही स्वतःच्या अभिनयाच्या जोरावरही चित्रपट सुपरहिट करून दाखवले आहेत आणि पुढच्या संपूर्ण वर्षभराबद्दल बोलायचं तर २०२१ मध्ये १-२ नाही तर तब्बल ८ स्त्रीप्रधान बॉलिवूड चित्रपट रिलीज होणार आहे. सायना सायना नेहवालच्या जीवनावर आधारित बायोपिक 'सायना'मध्ये अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अमोल गुप्ते दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती टी-सीरिजनं केली आहे. येत्या २६ मार्चला हा बायोपिक चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. धाकड कंगना रणौतची मुख्य भूमिका असलेला 'धाकड' हा एक अॅक्शन थ्रीलर चित्रपट आहे. या चित्रपटाशी संबंधित अनेक गोष्टी कंगनानं सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत. हा चित्रपट यावर्षी १ ऑक्टोबरला रिलीज होणार असून यात कंगनाचा धाकड अवतार पाहायला मिळणार आहे. थलायवी धाकड व्यतिरिक्त कंगना रणौतचा बहुचर्चित थलायवी हा चित्रपट सुद्धा याचवर्षी रिलीज होणार आहे. या चित्रपटात ती तमिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या भूमिकेत दिसणार आहे. हा एक बायोपिक आहे. हा चित्रपट २३ एप्रिल २०२१ला रिलीज होणार आहे. तेजस कंगना रणौतचा तेजस हा चित्रपट सुद्धा याच वर्षी रिलीज होणार आहे. या चित्रपटासाठी कंगनानं खास ट्रेनिंग सुद्धा घेतलं आहे. काही दिवसांपूर्वीच कंगनानं या चित्रपटाच्या तयारीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. दरम्यान या चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणा अद्याप झालेली नाही. गंगूबाई काठियावाडी आलिया भट्टची मुख्य भूमिका असलेला 'गंगूबाई काठियावाडी' हा चित्रपट याच वर्षात रिलीज होणार आहे. या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला. ज्याला प्रेक्षकांनी खूप प्रेम दिलं. हा चित्रपट येत्या ३० जुलैला रिलीज होणार आहे. शेरनी बॉलीवूड अभिनेत्री विद्या बालन लवकरच शेरनी या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात विद्या बालन एका वन अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. करोना व्हायरसमुळे या चित्रपटाचं शूटिंग थांबवण्यात आलं होतं. आता या चित्रपटाचं शूटिंग पुन्हा एकदा सुरू करण्यात आलं आहे. रश्मि रॉकेट तापसी पन्नूचा चित्रपट रश्मि रॉकेट हा एक स्पोर्ट्स ड्राम चित्रपट असणार आहे. आकाश खुराना दिग्ददर्शित हा चित्रपट या वर्षाच्या अखेरपर्यत रिलीज होणार आहे. या चित्रपटासंबंधी अनेक फोटो तापसीनं तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. शाबाश मिठु मिताली राजचा बायोपिक 'शाबाश मिठु' सुद्धा याचवर्षी रिलीज होणार आहे. ज्यात अभिनेत्री मुख्य भूमिकेत आहे. राहुल ढोलकिया दिग्दर्शित हा चित्रपट खरंतर ५ फेब्रुवारीला रिलीज होणार आहे. पण करोना व्हायरसमुळे ही तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3bsqbeS