मुंबई- करोना विषाणूमुळे झालेल्या लॉकडाउनमध्ये आमिर खानची मुलगी ही हेअरड्रेसर झाली. नुकताच तिचा प्रियकर आणि फिटनेस ट्रेनर याने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक फोटो शेअर केला. यात इरा त्याला हेअर कट देताना दिसत आहे. मात्र, या फोटमध्ये नुपूरने इराची तक्रार केली आहे. जेव्हा इरा त्याचे केस कापत होती, त्याचवेळी तिचं अर्ध लक्ष तिच्या फोनवरही होतं. इरानेही दिलं उत्तर नेमकी हीच गोष्ट नुपूरला आवडली नाही. त्याने इरा फोनमध्ये बघतानाचा फोटो क्लिक केला आणि तो सोशल मीडियावर शेअर करत म्हटलं की, 'या डिस्ट्रॅक्शन्सला काय बोलू! फोकस कर इरा. 'या फोटोत इराच्या एका हातात फोन दिसत आहे तर दुसऱ्या हातात कैची पकडली आहे. यावर इराने लिहिलं की, 'तू पण बसून खेळतच होतास.' व्हॅलेन्टाइन डेच्या दिवशी इराने नुपूरसोबतचे संबंध अधिकृतपणे चाहत्यांना सांगितले होते. कोण आहे नुपूर शिखरे? यापूर्वी इरा न्यूयॉर्कचा संगीतकार मिशल कृपलानी याला डेट करत होती. नुपूरबद्दल बोलायचं झालं तर तो Fitnessism चा संस्थापक आहे. याशिवाय तो फिटनेस तज्ज्ञ आणि सल्लागार आहे. आमिर खानचा तो फिटनेस ट्रेनरही आहे. याशिवाय, गेल्या १० वर्षांपासून तो सुष्मिता सेनचा फिटनेस ट्रेनर राहिला आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3kZoh8D