नवी दिल्लीः भारतात गॅलेक्सी एम सीरीज स्मार्टफोन्सचा दुसरा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी सॅमसंग कार्निवलाची घोषणा करण्यात आली आहे. या सेलची सुरुवात झाली आहे. हा सेल १२ मार्च पर्यंत सुरू राहणार आहे. या सेलमध्ये अॅमेझॉन आणि सॅमसंगच्या अधिकृत वेबसाइटवर गॅलेक्सी एम सीरीज मॉडल्सवर डिस्काउंट आणि ऑफर्स दिले जात आहे. वाचाः ग्राहकांना एचडीएफसी क्रेडिट कार्ड आणि ईएमआय ट्रान्झॅक्शन वर फ्लॅट १ हजार रुपयांचा डिस्काउंट मिळणार आहे. तसेच ग्राहकांना एक नवीन गॅलेक्सी एम सीरीज स्मार्टफोन्ससाठी जुन्या स्मार्टफोन्सला एक्सचेंज करण्यावर १ हजार रुपयांचा कॅशबॅक मिळणार आहे. सॅमसंग कार्निवाल दरम्यान ग्राहकांना Galaxy M21, Galaxy M31, Galaxy M31s आणि Galaxy M51 स्मार्टफोन्सवर ऑफर्सचा फायदा घेता येऊ शकणार आहे. वाचाः Samsung ने Galaxy M21 ला गेल्या वर्षी मे महिन्यात लाँच केले होते. अॅमेझॉनवर आता या फोनच्या ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या फोनला १३ हजार ९९९ रुपयात खरेदी करता येऊ शकते. या फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा कॅमेरा आणि 6,000mAh बॅटरी दिली आहे. Galaxy M31 ला गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात लाँच करण्यात आले होते. सध्या अॅमेझॉनवर १६ हजार ४९९ रुपयांच्या किंमतीत हा फोन उपलब्ध आहे. या फोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा कॅमेरा आणि 6,000mAh बॅटरी दिली आहे. वाचाः Galaxy M31s ला सॅमसंगने गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात लाँच केले होते. अॅमेझॉनवर याची विक्री १८ हजार ४९९ रुपयांच्या किंमतीत केली जात आहे. या स्मार्टफोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. या फोनमध्येही ६४ मेगापिक्सलचा कॅमेरा आणि 6,000mAh बॅटरी दिली आहे. Galaxy M51 फोनला गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात लाँच केले होते. अॅमेझॉनवर हा फोन २२ हजार ९९९ रुपये किंमतीत खरेदी करता येऊ शकतो. या स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन ७३० जी प्रोसेसर, ६४ मेगापिक्सलचा कॅमेरा सेटअफ आणि 7,000mAh बॅटरी दिली आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3cik2Rx