मुंबईः घरातले जुने, निकामी झालेले मोबाईल फोन, चार्जर, लॅपटॉप, की-बोर्ड, माऊस, टीव्ही, डेस्कटॉप कॉम्प्युटर, मिक्सर, ओव्हन, इस्त्री, फ्रीज, वॉशिंग मशिन इत्यादींची विल्हेवाट कशी लावावी हा प्रश्न तुम्हाला अनेकदा निर्माण होत असेल. दुसरीकडे या इलेक्ट्रॉनिक वस्तू अयोग्य पध्दतीने फेकून दिल्यास त्यातून विषारी रसायने बाहेर पडून माती, हवा, पाणी यावर विपरित परिणाम होण्याचा धोका असतो. अशा या टाकावू इलेक्ट्रॉनिक वस्तू गोळा करून त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी या कंपनीने नुकतेच बुक माय जंक नावाचे अॅप विकसित केले आहे. कचऱ्याच्या पेट्यांप्रमाणेच मुंबई आणि ठाण्यात ठिकठिकाणी ‘’ बसवण्यात आले असून अॅपच्या माध्यमातून या टाकावू वस्तू टाकता येणार आहे. मुंबई आणि ठाण्यात एकूण १०० ठिकाणी ‘इको-बिन’ बसवण्यात आले आहे. वाचाः इको रीसायकलिंग लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक बी. के. सोनी म्हणाले, ‘देशात सामाजिक - आर्थिक प्रगतीत वाढ होतेय तशी ई- कचऱ्यातही वाढ होत आहे. या ई-कचऱ्याची विल्हेवाट कशी लावावी हा अनेकांसमोर प्रश्न असतो. त्यावर समाधान म्हणून ‘’ हे वापरायला सोपे असे ॲप आम्ही तयार केले आहे. या माध्यमातून सर्वसामान्य जनता तसेच संस्था आपला ई- कचरा संकलन व रिसायकल जबाबदारीने करू शकतात. वाचाः ॲपच्या चाचणी दरम्यान नोंदणीकृत सभासदांच्या सोयीसाठी ६९२ भागांतून ११८ फेऱ्या करून ई कचरा गोळा करण्यात आला होता. अनेक ठिकाणी ई कचऱ्याची अयोग्य पद्धतीने विल्हेवाट होत असल्याने लोकांचे आरोग्य धोक्यात येऊन पर्यावरण व्यवस्थेचा ऱ्हास होत असल्याचे दिसून आले आहे. याचा परिणाम अनेक पिढ्यांना भोगावा लागणार आहे. आर्थिक लाभापेक्षा पर्यावरणाला अधिक महत्त्व देणाऱ्या नागरिकांकडून या ॲपला मोठा प्रतिसाद मिळत आहे. वाचाः ई कचरा निर्मितीमध्ये भारताचा जगात चौथा क्रमांक असून देशात वर्षाला ३.२ दशलक्ष मेट्रिक टन इतका ई कचरा निर्माण होतो . त्यापैकी सुमारे ३० टक्के पश्चिम भारतात निर्माण होत असल्याचे आढळून आले आहे. सन २०२५ पर्यंत भारतात ८ दशलक्ष मेट्रिक टन एवढा ई-कचरा निर्माण होईल असा अंदाज आहे. वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Q8lSgi