Full Width(True/False)

एक नारळ दिलाय... दिव्या पुगावकर आणि सिद्धार्थ खिरीद यांचा धम्माल डान्स व्हिडिओ व्हायरल

मुंबई:'' ही मालिका कमी कालावधीत लोकप्रिय झाली. या मालिकेतील मुख्य भूमिका करणारी अभिनेत्री आणि तिचा सहकलाकार यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच गाजतोय. या व्हिडिओमध्ये ते 'एक नारळ दिलाय...' या गाण्यावर नाचत आहेत. मालिकेच्या सेटवर केलेल्या या नृत्याचा व्हिडिओ सिद्धार्थनं सोशल मीडियावर शेअर केला. त्यांच्या सुपरहिट नृत्यामुळे नेटकऱ्यांनी त्यांचं कौतुक केलंय. सिद्धार्थ नेहमीच असे नृत्याचे व्हिडिओ पोस्ट करत असतो. त्याची सहकलाकार दिव्यासह मात्र हा त्याचा पहिलाच व्हिडीओ असल्याचं त्यानं म्हटलंय. त्यांच्या या पोस्टला अनेकांच्या कमेंट्स आल्या असून असे आणखी व्हिडिओ बघण्यास उत्सुक असल्याचं त्यांच्या चाहत्यांनी सांगितलंय.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3czO5US