Full Width(True/False)

दोन सेल्फीचा Moto G100 फोनचा फोटो लीक, डिझाइनची माहिती उघड

नवी दिल्लीः स्मार्टफोनचा फोटो लीक झाला आहे. फोनला लवकरच ग्लोबली लाँच केले जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, Moto G100 गेल्या महिन्यात चीनमध्ये लाँच केलेल्या चे ग्लोबल वेरियंट व्हेरियंट असणार आहे. लीक फोटो वरून Moto G100 मध्ये मोटो एज एस प्रमाणे ड्यूल होल पंच कटआउट असल्याची माहिती आहे. फोनमध्ये सर्व फीचर्स हे मोटो एज एसचे दिले जाण्याची शक्यता आहे. वाचाः TechnikNews कडून शेयर करण्यात आलेल्या फोटो नुसार, मोटो G100 मध्ये मोटोरोला एज एसची डिझाइन दिली आहे. मोटो एज एसला चीनमध्ये फेब्रुवारी मध्ये लाँच करण्यात आले होते. या फोनच्या किनाऱ्यावर स्लीम बेजल आणि डिस्प्ले खाली व वरच्या बाजुला रुंद चीन दिली आहे. डिस्प्ले वर सर्वात वरच्या बाजुला डाव्या कोपऱ्यात दोन सेल्फी कॅमेरे उपलब्ध आहे. सेल्फी कॅमेरा सेटअप साठी वेगळा कटआउट आहे. रियर वर हँडसेट मध्ये फ्लॅश सोबत क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो. रिपोर्टवरुन हे संकेत मिळतात की, फोनमध्ये १०० चे कलर व्हेरियंट एज एस पेक्षा थोडे वेगळे आहे. वाचाः Moto G100:फीचर्स कंपनीने नुकतेच एका फोनचे टीजर जारी केले होते. ज्यात यूएसबी टाइप सी पोर्ट, स्नॅपड्रॅगन ८७० प्रोसेसर आणि ३.५ एमएम हेडफोन जॅक दिले जाणार आहेत. हा फोन मोटो जी १०० असू शकतो. प्रोसेसर शिवाय, या फोनमध्ये ६.७ इंचाचा फुल एचडी +(1080x2520 पिक्सल) डिस्प्ले असणार आहे. ९० हर्ट्ज रिफ्रेश रेट सोबत येणार आहे. मोटोच्या या फोनमध्ये २५६ जीबी इनबिल्ट स्टोरेज दिला जाऊ शकतो. वाचाः फोनमध्ये रियरवर क्वॉड कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. मोटोच्या या फोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी, १६ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर, २ मेगापिक्सलचा डेप्थ आणि एक टाइम ऑफ फ्लाइट सेन्सर असू शकतो. हँडसेटमध्ये पुढच्या बाजुला १६ मेगापिक्सलचा प्रायमरी आणि ८ मेगापिक्सलचा सेकंडरी अल्ट्रा वाइड अँगल लेन्स असू शकतो. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3eFOR5C