मोठी होळी पेटवण्यासाठी आमच्या कॉलनीतली मोठी मुलं मिळून मोठी होळी पेटवायचे. एका होळीच्या आधी मी आणि माझ्या मित्रांनी ठरवलं की यंदा आपण त्यांच्यापेक्षा मोठी होळी पेटवायची. एका घराबाहेर ठेवलेला लाकडाचा उंच ओंडका होळीत टाकला तर आपली होळी नक्की मोठी होईल, असं आम्हाला वाटलं होतं. कोणाचं लक्ष नसताना तो ओंडका आम्ही आमच्या हद्दीत घेऊन येत होतो. तितक्यात एका काकांनी 'हा लाकडाचा ओंडका होळीसाठी ठेवलेला नाही. जिथून उचललात तिथेचं परत नेऊन ठेवा', असं त्यांनी सांगितलं. तेव्हा पुन्हा आपल्याला हेलपाटा पडणार म्हणून वाईट वाटलं होतं. पण आता तेव्हा आपल्याकडून चोरी झाली नाही, याबद्दल बरं वाटतंय. - आठवडाभर आधीपासून डाएट मला पहिल्यापासूनच पाण्यात खेळायला खूप मजा वाटते. रंगपंचमीच्या दिवशी मी खूप धमाल करते. हा सण म्हणजे रंग आणि आनंद यांचं एक समीकरण आहे, असं मला नेहमी वाटतं. काही वर्षांपूर्वी 'पिंजरा' या मालिकेत काम करत असताना त्या सेटवर आम्ही कलाकारांनी मिळून साजरी केलेली रंगपंचमी माझ्या विशेष लक्षात आहे. सणाच्या निमित्तानं खूप गोडधोड खाणं होतं. होळीला आपल्याला मनसोक्त गोड खायला मिळायला हवं म्हणून मी आठवडाभर आधीपासून डाएट करते. - संस्कृती बालगुडे चेहऱ्यावरचा लाल रंग एकदा रंगपंचमीला मी ठाण्याला माझ्या आत्याच्या घरी गेलो होतो. माझ्या दोन आत्ये बहिणींसह मी रंगपंचमी खेळणार होतो. खेळत असतानाच आम्हाला एक कल्पना सुचली. हळद आणि कुंकू वापरून आम्ही रंग तयार केले. सगळ्यांच्या चेहऱ्याला रंग म्हणून कुंकू लावलं. चेहऱ्यावरचा तो लाल रंग खूप भीतीदायक वाटत होता. ही दहा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळी काढलेला व्हिडीओ आमच्याकडे अजूनही आहे. आता तो रंगलेल्या चेहऱ्यांचा व्हिडिओ बघताना खूप मजा येते. - भूषण प्रधान दुप्पट सेलिब्रेशन तिथीनं धुळवडीच्या दिवशी माझा वाढदिवस असतो. पण रंग खेळायला मला अजिबात आवडत नाही. होळीत अर्पण केलेले नारळ काठीनं बाहेर काढायला मात्र मला आवडायचं. माझा वाढदिवस आणि सण असं दोन्ही एकाच दिवशी असल्यामुळे लहानपणापासून या दिवशी दुप्पट सेलिब्रेशन असतं. पुरणपोळी माझी खूप लाडकी आहे. या वर्षीसुद्धा आईच्या हातच्या पुरणपोळ्या खायला मी खास पुण्याला घरी जाणार आहे. - भार्गवी चिरमुले अविस्मरणीय होळी एकदा होळीसाठी माझे बाबा मला खास आमच्या गावी पेणला घेऊन गेले होते. तिथली होळी मी अनुभवावी अशी त्यांची इच्छा होती. गावची होळी ही जवळजवळ २० ते ३० फूट उंच होती. सगळे गावकरी एकत्र जमले होते. तो माहोल खरंच खूप सुंदर होता. सगळ्या वाईट गोष्टी संपून आता चांगल्याची सुरुवात होऊ दे, अशी प्रार्थना सगळे करत होते. आणखी एका होळीची आठवण म्हणजे होळी पेटवल्यानंतरच्या पहाटे मी लवकर उठायचो. होळीत अर्पण केलेले नारळ गोळा करायला मला खूप आवडायचं. - सुयश टिळक संकलन - गौरी आंबेडकर, एसएनडीटी विद्यापीठ


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3su6B85