Full Width(True/False)

‘ट्राय’ने सांगूनही टेलिकॉम कंपन्यांकडून हे नियम अंमलात आणण्यास टाळाटाळ

म. टा. प्रतिनिधी, पुणे केंद्रीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने () व्यावसायिक ‘एसएमएस’बद्दल लागू केलेले नवे नियम टेलिकॉम कंपन्यांनी अंमलात न आणल्याने नागरिकांना वन टाइम पासवर्ड (ओटीपी) मिळण्यास अनेक अडथळे येत आहेत. यावर ‘ट्राय’कडून सात दिवसांची अतिरिक्त मुदत देण्यात आली असून पुढील सात दिवसांच्या आत नवे नियम स्वीकारावेत, असे आदेश टेलिकॉम कंपन्यांना देण्यात आले आहेत. वाचाः ‘ट्राय’ने काही दिवसांपूर्वी व्यावसायिक एसएमएसच्या स्वरूपामध्ये बदल केला होता. नागरिकांची फसवणूक होऊ नये, यासाठी ‘ट्राय’ने काही एसएमएस टेम्पलेट्स तयार करून त्याची कार्यवाही सर्व टेलिकॉम कंपन्यांना करायला सांगितली होती. यामुळे फसवणूक करण्याच्या बहाण्याने एसएमएस करणाऱ्या व्यक्तींना आळा बसेल, असे ‘ट्राय’कडून सांगण्यात आले होते. टेलिकॉम कंपन्यांनी हे नवे नियम अंमलात आणले नसल्याने वन टाइम पासवर्ड संदर्भात अडथळे येत आहेत. यामुळे नागरिकांना मनस्ताप होत असला, तरीही अनेक नवे नियम स्वीकारण्यास तयार नसल्याचे चित्र आहे. ‘ट्राय’ने याबाबतीत काहीतरी स्वतंत्र व्यवस्था करावी, अथवा हे नियम काढून टाकावेत, अशी मागणी कंपन्यांकडून करण्यात येत आहे. वाचाः दरम्यान, ‘ओटीपी’संदर्भात अडचणी येत असल्याचे नागरिकांनीही मान्य केले आहे. एखादा ऑनलाइन व्यवहार करत असताना प्रत्येक वेळी ओटीपी द्यावा लागतो. त्याचा एसएमएस उशिराने मिळतो किंवा कधी कधी येतच नाही, अशा तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. हा तिढा सोडवण्यासाठी ‘ट्राय’कडून सात दिवसांची अतिरिक्त मुदत देण्यात आली असून यामध्ये सर्व कंपन्यांनी एसएमएस टेम्पलेटची नोंदणी करून घ्यावी, असे ‘ट्राय’कडून स्पष्ट करण्यात आले आहे. सर्व कंपन्यांच्या टेलिकॉम सर्कलमध्ये एसएमएस टेम्पलेटची नोंदणी झाल्यास ही अडचण येणार नाही, असेही ‘ट्राय’कडून सांगण्यात आले असून लवकरात लवकर हे नियम लागू करण्याची व्यवस्था टेलिकॉम कंपन्यांनी करावी, अशी सूचना ‘ट्राय’कडून करण्यात आली आहे. वाचाः नव्या नियमांची आखणी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून करण्यात आली आहे. एकीकडे मोबाइलद्वारे होणारी फसवणूक टाळण्यासाठी काही कठोर नियम करणे आवश्यक आहे. टेलिकॉम कंपन्यांना सात दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असून या काळात त्यांनी आपल्या ‘एसएमएस’च्या पद्धती नोंदणीकृत करून घ्याव्यात. - एस. के. गुप्ता, सचिव, ट्राय सुरक्षेसाठी नवे नियम महत्त्वाचे यापूर्वी व्यावसायिक ‘एसएमएस’वर कोणत्याही प्रकारचे निर्बंध नसल्याने काही फसवणूक करणाऱ्या व्यक्ती अशा प्रकारच्या ‘एसएमएस’चा मोठ्या प्रमाणावर वापर करत होत्या. आता नव्या नियमांनुसार टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्या व्यावसायिक ‘एसएमएस’चे टेम्पलेट्स नोंदणीकृत केल्यानंतर नागरिकांची फसवणूक टळू शकणार आहे. यासाठी हे नियम अंमलात आणणे आवश्यक असून त्याला टेलिकॉम कंपन्या का विरोध करत आहेत, याबद्दलचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3rMTG0D