Full Width(True/False)

सोहळ्यात अभिनेत्रीनं स्टेजवरच उतरवले कपडे, नेमकं काय घडलं

फ्रान्स: फ्रेंच ऑस्कर सेरेमनीमध्ये शुक्रवारी अशी घटना घडली ज्यामुळे सगळीकडे खळबळ माजली. अभिनेत्री कोरिन मासेरियोनं विरोध प्रदर्शन करत स्टेजवरच सर्वांसमोर आपले कपडे उतरवले. ५७ वर्षीय अभिनेत्री जेव्हा स्टेजवर पोहोचली त्यावेळी तिनं गाढवासारखा दिसणारा पोशाख घातला होता. ज्यावर रक्ताचे डाग होते. उपस्थित लोकांना काही समजायच्या आतच कोरिननं विरोध प्रदर्शन करत स्टेजवरच आपले कपडे उतरवले. मागच्या तीन महिन्यांपासून फ्रान्समधील चित्रपटगृह बंद आहेत. फ्रेंच अभिनेत्री कोरिन मासेरियोचं म्हणणं आहे की, सरकारनं करोना व्हायरसच्या संक्रमणादरम्यान संस्कृती आणि कलेशी संबंधित लोकांना पाठिंबा द्यायला हवा. स्टेजवर बेस्ट कॉस्ट्यूम अवॉर्ड देण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. मात्र स्टेजवर येताच सर्वांसमोर कपडे उतरवत तिनं सर्वांनाच चकित केलं. ती सर्वांसमोर नग्नावस्थेत उभी होती आणि तिच्या शरीरावर संदेश लिहिला होता. तिच्या शरीरावर लिहिलं होतं, 'नो कल्चर, नो फ्यूचर' म्हणजेच संस्कृती नाही तर भविष्य नाही. पंतप्रधान जीन कॅस्टेक्स यांच्याविरोधात घोषणा यासोबतच कोरिननं फ्रान्सचे पंतप्रधान जीन कॅस्टेक्स यांना उद्देशून आपल्या पाठीवरही संदेश लिहिला होता. तिच्या पाठीवर लिहिण्यात आलेला हा संदेश फ्रेंच भाषेत होता. ज्यात लिहिलं होतं, 'आमची संस्कृती आम्हाला परत द्या जीन' ज्याचा अर्थ, 'आम्हाला आमचं पैसे कमावण्याचं साधन परत द्या' असा होतो. कोरिन मासेरियासोबत इतर कलाकरांनीही विरोध प्रदर्शन केलं. स्क्रिनप्ले अवॉर्ड जिंकणारे स्‍टीफन डेमोस्‍ट‍ियर यांनी आपल्या भाषणात सरकारचा विरोध केला. ते म्हणाले, 'आमची मुलं मॉलमध्ये कपडे खरेदी करण्यासाठी जाऊ शकतात. मात्र ते चित्रपटगृहात जाऊ शकत नाही. हे समजण्यापलिकडे आहे.' या आधी मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये शेकडोंच्या संख्येनं अभिनेता, दिग्दर्शक, संगीतकार, चित्रपटांचे टेक्निशियन्स आणि समीक्षक यांनीही पॅरिसमध्ये चित्रपट आणि कला संस्कृतीच्या बचावासाठी आवाज उठवला होता. करोना व्हायरसचं वाढतं संक्रमण पाहता फ्रान्स सरकारनं देशातल्या सर्व चित्रपटगृह आणि नाट्यगृह यांवर बंदी घातली आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2OOzY66